Saurav Das, Ashutosh Ranka 
देश

CJP काँग्रेसच्या रामलीला मैदानावरील आंदोलनात का नव्हती? माजी न्यायमूर्तींचा टीकात्मक खुलासा

CJP : देशभरात केंद्र सरकारविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रान पेटवणाऱ्या कॉक्रोज जनता पार्टीवर माजी न्यायमूर्तींनी गंभीर आरोप केले आहेत.

Amit Ujagare

CJP : दिल्लीतील रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्यावतीनं आयोजित आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीचे नेते का नव्हते? याचा टीकात्मक खुलासा माजी न्यायमूर्तींनी केला आहे. देशभरात केंद्र सरकारविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रान पेटवणाऱ्या कॉक्रोज जनता पार्टीवर या न्यायमूर्तींनी गंभीर आरोपही केले आहेत.

कोण आहेत सीजेपीचे टीकाकार न्यायमूर्ती?

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्केंडेय काटजू यांनी ही टीका केली असून ट्विट करत त्यांनी सीजेपीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांचं करियर संपलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, आत्तापर्यंत सौरव दास आणि आशुतोष रांका हे एक आठवड्यासाठी तुरुंगात गेले होते, पण आता ते तुरुंगात जायला घाबरत आहेत. आपल्या या विधानातून काटजून यांनी काँग्रेसनं काढलेल्या रामलीला मैदानावरील आंदोलनात सीजेपीच्या नेत्यांचा सहभाग का नव्हता हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मार्केंडेय काटजू यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, सीजेपीच्या नेत्यांनी शांतता बंधपत्रावर सह्या केल्या आहेत, हा प्रकार एखाद्या माफीनाम्यापेक्षा कमी नाही. ज्यांनी या सह्या केल्या आहेत त्यांचं करिअल संपलं आहे, यांच्यावर जनता भरवसा करणार नाही. त्यामुळं त्यांची प्रतिमा पळपुट्यांसारखी बनली आहे. हे तुम्हाला लक्षात असेल की, जेव्हा इंग्रजांचं शासन होतं तेव्हा अधिकार लोक ज्यांना अटक करायचे त्यांना म्हणायचे तुम्ही माफी मागा, तर तुम्हाला सोडू अन्यथा तुम्हाला काळ्या पाण्याच्या शिक्षेत सडावं लागेल. जे लोक माफीनामे लिहित होते त्यांचं करिअर संपत होतं"

तुरुंगात जायला घाबरतात

सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांनी म्हटलं की, शांतता बंधपत्र म्हणजे तुम्ही हे शपथपत्र लिहून दिलंय की, तुम्ही कोणतंही आंदोलन करणार नाहीत. कारण जर तुम्ही आंदोलन केलं तर, पोलीस म्हणतील की तुम्ही शांतता भंग करत आहात. तुम्ही शांतता बंधपत्राचं उल्लंघन केलं आहे तसंच तुम्हाला मोठ्या काळासाठी तुरुंगात टाकावं लागेल. आजपर्यंत सौरव दास आणि आशुतोष रांका एका हप्त्यासाठी तुरुंगात गेले होते. आता हे लोक तुरुंगात जायला घाबरत आहेत. त्यामुळं आता सीजेपी संपली आहे. यांचा पाठीचा कणा तुटला आहे.

सीजेपी नेत्यांनी लिहून दिले बॉण्ड

आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी १३ ऑक्टोबरला ताब्यात घेतलं होतं. दोघांवर आरोप होता की, ते जंतर-मंतरवर लावलेले बॅरिकेट्स तोडून आत घुसले होते. १४ ऑक्टोबरला त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १९ ऑक्टोबरला त्यांची कोठडी दोन दिवसांनी आणखी वाढवण्यात आली होती. पण नंतर त्या दोघांना कोर्टानं जामीन दिला होता.

धर्मनिरपेक्षता एकतर्फी असू शकत नाही - काटजू

न्या. काटजू यांनी पुढे म्हटलं की, धर्मनिरपेक्षता ही एकतर्फी असू शकत नाही ती दोन्ही बाजुंनी असायला हवी. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांनी म्हटलं की, जेव्हा मुसलमानांवर अन्याय होतो, तेव्हा या अन्यायविरोधात त्यांचा आवाज बुलंद होतो. पण जेव्हा काश्मिरी पंडीतांवर अन्याय झाला तेव्हा भारतातील सर्व मुस्लिमांनी आपल्या तोंडाला कुलूप लावलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT