Abhijeet Dipke, Narendra Modi Sarkarnama
देश

CJP protest update : रेल्वे, मेट्रो, इंटरनेट बंद... हजारो तरुण पोलिसांच्या ताब्यात! मोदींनी अधिकृतपणे लागू केली आणीबाणी, दिपकेंच्या आरोपांना धार

PM Narendra Modi, Abhijeet Dipke, Cockroach Janata Party, Gyanesh Kumar : आमच्या आंदोलनामुळे रेल्वे, मेट्रो बंद केली आहे. पोलिस, सरकारच्या प्रयत्नाचे हसू येते. किती लोकांना ताब्यात घेणार, असा सवाल दिपकेंनी केला आहे.

Rajanand More

Jantar Mantar protest news : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीकडून १० ऑक्टोबरला दिल्लीतील जंतर मंतर याठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच दिल्लीसह देशभरातील विविध राज्यांतील पोलीस सतर्क झाले आहेत. दिल्लीला निघालेल्या आंदोलकांची धरपकड सुरू आहे. तसेच दिल्लीतील अनेक मेट्रो स्टेशन बंद ठेवली जाणार असून रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. यापार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सोशल मीडियात पोस्ट करत नरेंद्र मोदी यांनी आता अधिकृतपणे आणीबाणी लागू केल्याची टीका केली आहे. रेले बंद, मेट्रो बंद, इंटरनेट बंद, अशी पोस्टही त्यांनी केली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातील हजारो तरूणांना भाजप सरकारकडून ताब्यात घेतले जात असल्याचा दावाही दिपके यांनी केला आहे. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आंदोलनाआधीच हा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे. त्यावरून मीडियाशी बोलताना दिपकेंनीही टीका केली आहे. फक्त रेल्वे, मेट्रो कशाला देशच बंद करा, असे त्यांनी म्हटले आहे.

आमच्या आंदोलनामुळे रेल्वे, मेट्रो बंद केली आहे. पोलिस, सरकारच्या प्रयत्नाचे हसू येते. किती लोकांना ताब्यात घेणार, असा सवाल दिपकेंनी केला आहे. अमित शहांनी वरचेवर बीपी चेक करत राहायला पाहिजे, असा टोला लगावत दिपकेंनी आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी परवानगी नाकारली

दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. मागील आंदोलनावेळी घालण्यात अटींचे पालन झाले नाही, असे कारण पोलिसांनी दिले आहे. दरम्यान, पोलिसांनी खबरदारी म्हणून जंतर मंतर याठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. आंदोलकांना जंतर मंतरवर पोहोचण्यापासूनच रोखण्याचे नियोजन पोलिसांकडून केल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT