CJP Protest Continue Ashutosh Ranka sarkarnama
देश

CJP Protest : सुटका होताच 'सीजेपी' नेत्यांची मोठी मोठी घोषणा, आशूतोष रांकांनी स्पष्ट सांगितले, 'ही लढाई...'

CJP Protest Continue Ashutosh Ranka :आम्ही स्पष्ट करतो की लढाई ही आत्ता सुरू झाली आहे. ही लढाई युद्धा सारखी बनवण्यासाठी अमित शाह मोदींना लाज वाटली पाहिजे, असे आशूतोष रांका यांनी म्हटले.

Roshan More

CJP News : पोलिसांच्या ताब्यात अभिजीत दीपके, आशूतोष रांका, सौरभ दास यांना सोडण्याचे आदेश दंडाधिकाऱ्यांनी दिले होते. सुटका होताच सीजेपीचे नेते आशूतोष रांका, सौरभ दास यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले, 'ही लढाई आत्ता सुरू झाली आहे. ती सुरुच राहणार आहे. ही लढाई युद्धा सारखी बनवण्यासाठी अमित शाह मोदींना लाज वाटली पाहिजे.'

आशूतोष रांका म्हणाले की, 'आणीबाणी बद्दल आम्ही आमच्या पालकांकडून ऐकले होते. मात्र, त्या आणीबाणीला मागील ७२ तासात नरेंद्र मोदींनी मागे सोडले. हुकुमशा नरेंद्र मोदींनी रेल्वे बंद केल्या, भारताच्या इतिहास असं कधीच झालेल नाही. इंदिरा गांधींनी देखील आणीबाणीत रेल्वे बंद केल्या नव्हत्या.'

पुढे बोलताना ते म्हणाले,'एक गोष्ट स्पष्ट होते की जी लढाई निवडणूक आयोगाच्या विरोधात होती ती लढाई नरेंद्र मोदींनी, अमित शाहाने स्वतःच्या विरोधात केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की काही करून ज्ञानेश कुमारांना ते वाचवणार आहेत.'

'आम्ही पहिल्यापासून सांगतोय की, निवडणूक आयोग नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून काम करतोय. भाजपला जिंकवण्यासाठी काम करतो आहे. काल विमानात घुसून सौरभला, मला आणि दीपके यांना किडनॅप केले. अभिजीत दीपकेंच्या आजीच्या निधनाविषयी माहिती मिळाली तेव्हा देखील पोलिसांनी सहकार्य केले नाही. '

आम्ही स्पष्ट करतो की लढाई ही आत्ता सुरू झाली आहे. ही लढाई युद्धा सारखी बनवण्यासाठी अमित शाह मोदींना लाज वाटली पाहिजे.

हे प्रदर्शन सुरू आहे. सीजेपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे. डाव्या विद्यार्थी संघटनाच्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले जात आहे. शांततेने आंदोलन करणाऱ्यांना देखील ताब्यात घेतले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT