Manoj Jarange on CJP Protest Sarkarnama
देश

CJP Protest: जरांगे पाटलांची जंतर-मंतरवर 'एन्ट्री'! अंतरवाली सराटी आंदोलनाचा दाखला देत अभिजीत दीपकेंना दिला कानमंत्र

Manoj Jarange Patil met CJP founder Abhijit Dipke : दिल्लीतील जंतर-मंतरवर मनोज जरांगे पाटील यांनी CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनाची जागा सोडू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

Mangesh Mahale

Manoj Jarange on CJP Protest: दिल्लीतील जंतर-मंतरवर मनोज जरांगे पाटील यांनी CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनाची जागा सोडू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

नवी दिल्ली: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाला आता विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून पाठिंबा मिळू लागला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जंतर-मंतरवर जाऊन CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना धीर देत "कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाची जागा सोडू नका. अन्यथा सरकार आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करेल," असा सल्ला दिला. जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना शांततापूर्ण आंदोलनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, लोकशाहीत शांततेच्या मार्गाने लढलेले आंदोलन अधिक प्रभावी ठरते आणि जनतेचा पाठिंबा मिळाल्यास सरकारलाही निर्णय घ्यावा लागतो.

'शांततेच्या आंदोलनात मोठी ताकद

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "शांततेच्या आंदोलनात किती ताकद असते, हे आम्ही मराठा आरक्षण आंदोलनातून दाखवून दिले आहे. आम्हीही तुमच्या सोबत आहोत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाचे ठिकाण सोडू नका. तुम्ही येथून निघालात तर सरकार आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न करेल."

सरकारवर साधला निशाणा

यावेळी जरांगे पाटील यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. "ज्यांना आपण मतदान करून सत्तेत पाठवले, तेच आज विद्यार्थ्यांवर कारवाई करत आहेत. देशातील विद्यार्थी, युवक आणि सामान्य जनतेची ताकद सरकारने कमी लेखू नये," असे ते म्हणाले. गरिबांवर लाठ्या चालवल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला. जंतर-मंतर ही जागा सोडू नको आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास जरांगेनी आंदोलकांना दिला.

मराठा आंदोलनाचा दाखला

अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाची आठवण करून देताना जरांगे पाटील म्हणाले, "आम्हीही गोरगरीबांच्या मुलांसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी आमच्या आंदोलनावरही पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र, आम्ही शांततेचा मार्ग सोडला नाही. अखेर आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली."

त्यांनी विद्यार्थ्यांना संयम आणि एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन करत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांनी आंदोलनकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन करत शांततेच्या मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. पूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.

भेटीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. "तुमच्या मागण्यांसाठी संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. संघर्ष सुरू ठेवा, पण तो शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गानेच करा," असे आवाहन त्यांनी केले.

दिल्लीतील CJP आंदोलनाला विविध संघटना आणि राजकीय नेत्यांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने या आंदोलनाकडे राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधले जात आहे. पुढील काही दिवसांत या आंदोलनाची दिशा काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT