CJP Protest: देशात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेला आणीबाणीच्या काळाची नेहमी चर्चा होत असते. या काळात लोकशाहीतील नागरिकांचे हक्क डावलण्यात आले होते. त्याची तुलना आजच्या दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी केली जात आहे. आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधींनीही असं केलं नाही, जे सध्या मोदी सरकार करत आहे, असा आरोप सीजेपीनं केला आहे. यासाठी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
दिल्लीत आंदोलनासाठी सीजेपीचे संस्थापक सदस्य अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास हे एकाच विमानानं सकाळी दिल्लीकडं रवाना झाले. पण विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होताच दिल्ली पोलीस थेट त्यांच्या विमानात घुसले आणि या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं. या तिघांना विमानातून विमानतळावर उतरु ही न देताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानं हा व्हिडिओ सीजेपीनं आपल्या सोशल मीडियातून शेअर केला आहे.
"इंदिरा गांधींनी देखील असं काही केलं नव्हतं" अशा शब्दांत अभिजीत दिपके यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर आम्ही अटक करुन घेण्यासाठीच इथं आलो आहोत, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, सीजेपीनं आरोप केला की, आंदोलनात सीजेपीच्या नेतृत्वानं सहभागी होऊ नये ताब्यात घेणं हा पूर्वनियोजित प्लॅन होता. या अटकेचा सीजेपीकडून कठोर शब्दांत निषेध करण्यात आला. त्यामुळं तातडीनं त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.