India-china Border
India-china Border Sarkarnama
देश

India-china : भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झटापट; 30 पेक्षा जास्त सैनिक जखमी

सरकारनामा ब्यूरो

India-china Border News : भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये ही झटापट झाली आहे. मात्र याबाबत अद्याप भारतीय लष्कराकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

संबंधित घटना ही ९ डिसेंबरला घडली असल्याचं सांगण्यात येतंय. तर या झटापटीत जवळपास ३० पेक्षा अधिक सैनिक जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही देशामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दोन्ही देशातील सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशाच्या सैन्यातील कमांडर स्तरावर चर्चा झाल्यानंतर दोन्ही बाजूचे सैन्य मागे घेण्यात आले असल्याचं देखील सांगण्यात येतंय.

गेल्या काही महिन्यांपूर्वी चीनच्या सैनिकांनी सिक्कीमच्या (Sikkim) नकुला भागात कुरापत काढली होती. तेव्हा देखील भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. तर आता पुन्हा दोन्ही देशातील सैनिकांमध्ये झटापट झाली असल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत भारतीय लष्कराकडून किंवा सरकारकडून याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (India-china Border News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT