अमृतसर : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान (Bhawant Mann) यांनी १६ मार्च रोजी शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेण्यास सरूवात केली आहे. मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी त्यांनी पावले टाकली आहे. मंगळवारी त्यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील ३५ हजार कंत्राटी व आऊटसोर्सिंगद्वारे सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनात सामावून घेण्याचे आदेश दिले. (Bhagwant Mann News)
आम आदमी पक्षानं (AAP) विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ९२ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या (Cabinet) तीन दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्याच बैठकीत पुढील एका महिन्यात २५ हजार नोकऱ्या देण्याचा निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री मान यांनी सरकारी नोकरीसाठी राबवण्यात येणारी कंत्राटी आणि आऊटसोर्सिंगद्वारे भरती पध्दत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सध्या वर्ग क व डमध्ये कार्यरत असलेल्या या पध्दतीने भरती करण्यात आलेल्या तब्बल ३५ हजार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.
मान यांनी याबाबतची माहिती दिली. राज्याच्या मुख्य सचिवांना ही भरती पध्दत बंद करण्याचे आदेश दिल्याचे मान यांनी सांगितले. सध्या बहुतेक राज्यांमध्ये ही पध्दत सुरू असल्याने तरूणाईमध्ये मोठ्या नाराजी आहे. लाखो सरकारी जागा रिक्त असून भरती प्रक्रियाही वेळेवर पूर्ण होत नाही. त्यामुळे बेरोजगारीही वाढत असल्याचा दावा केला जात आहे. अशा स्थिती मान यांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद इतर राज्यांमध्येही उमटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मान यांच्या कॅबिनेटमध्ये १० मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात ९ पुरुष आणि १ महिला मंत्र्यांचा समावेश आहे. यानंतर मान यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पुढील एका महिन्यात २५ हजार नोकऱ्या देण्याचा निर्णयास मान्यता देण्यात आली आहे.
याबाबत बोलताना मान म्हणाले होते की, निवडणुकीपूर्वी आम्ही दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पंजाबमधील तरुणांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्री मान यांनी दोन दिवसांपूर्वी भ्रष्टाचार रोखण्यासाठीही निर्णय जाहीर केला आहे. २३ मार्च रोजी भगतसिंग यांच्या शहिद दिनी पंजाब सरकारकडून भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईन नंबर जारी केला जाणार आहे. तो माझा स्वतःचा वैयक्तित व्हॉट्सअॅप नंबर असणार आहे. जर कोणी लाच मागितल्यास त्यांचे व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग या नंबरवर पाठवावे, भष्टाचाराच्या विरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. पंजाबमध्ये आता भ्रष्टाचार चालणार नाही, असे निर्णय जाहीर करताना मान म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.