Bhupesh Baghel, Sukhjinder Randhawa
Bhupesh Baghel, Sukhjinder Randhawa sarkarnama
देश

मुख्यमंत्री बघेल, रंधावा यांना विमानतळावरच अडविणार

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलनादरम्यान मोटार अंगावरून गेल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहे. त्यात चार आंदोलक शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (cm Bhupesh Baghel) आणि पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर एस रंधावा (Sukhjinder Randhawa) हे शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. मात्र, त्यांना विमानतळावर येण्याची परवानगी उत्तरप्रदेश सरकारने नाकारली आहे.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी लखनौ विमानतळ प्रशासनाला पत्र लिहुन ''छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर एस रंधावा यांना लखनऊ विमानतळावर  येण्याची अनुमती  देऊ नये,''  असे  सांगितले. बघेल आणि रंधावा यांनी आज लखीमपूर खीरीला भेट देण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश लखीमपूर खेरीतील कायदा आणी सुव्यवस्थेचे कारण  देत बघेल आणि रंधावा यांना लखनऊ  विमानतळावर येऊ न देण्यासाठी हे पत्र लिहले असल्याचे समजते.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसक चकमकीत शेतकऱ्यांच्या मृत्यूवरून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांच्यासह 14 जणांविरोधात खून, गुन्हेगारी कट आणि दंगल यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात लखीमपूरच्या टिकुनिया पोलिस ठाण्यामध्ये खून, गुन्हेगारी कट, अपघात आणि दंगलीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगजीत सिंह यांच्या तक्रारीवरून लखीमपूरच्या टिकुनिया पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे आंदोलनादरम्यान मोटार अंगावरून गेल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहे. त्यात चार आंदोलक शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी या घटनेचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा अमानुष प्रयत्न असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT