Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
देश

CM Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा असा होता प्लॅन बी ..म्हणाले, "राजकारणात नसतो तर मी.."

सरकारनामा ब्यूरो

CM Eknath Shinde interview : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. या निकालाकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी राजकारणात नसतो तर कुठे असतो, याबाबतचा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.

तुम्ही राजकारणात नसता तर कुठे असता, असा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी एक किस्सा सांगितला.

"मी राजकारणात नसतो तर आर्मीत असतो,' असे मुख्यमंत्री म्हणाले. पण काही कारणामुळे त्यांचे आर्मीत सिलेक्शन झाले नाही. "पण मी शिवसैनिक झालोच ना," असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनात शिंदे म्हणाले, "माझं आर्मीत सिलेक्शन झालं होतं. आर्मी मेडीकल कोरमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. तेव्हा लखनौ माझं ट्रेनिंग सेंटर होतं. मी वॉरंट घेऊन दोन ते चार लोकांसोबत ट्रेनिंग सेंटरला निघालो होतो. पण हरियाणामध्ये माझ्या एका मित्राच्या बहिणीचं लग्न होतं. हरी परमार असं माझ्या मित्राचं नाव आहे. मी त्याला त्याच्या बहिणीच्या लग्नाला येईन असं आश्वासन दिलं होतं,"

इतर गोष्टी अशाच राहून गेल्या..

"लखनौच्या दिशेने माझा प्रवास सुरू झाल्यानंतर अचानक माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मी त्या ट्रेनमधून उतरलो आणि दुसरी ट्रेन पकडून दिल्लीत गेलो. दिल्लीत बस पकडून त्याच्या ‘रोहतक’ या ठिकाणी गेलो आणि त्याच्या बहिणीच्या लग्नाला उपस्थिती लावली. त्यानंतर पुन्हा मी ट्रेनिंग सेंटरला गेलो. पण तारीख निघून गेल्यामुळे त्यांनी मला दुसरं वॉरंट घेऊन यायला सांगितलं. मात्र, त्यावेळी दंगल सुरू असल्यामुळे वॉरंट आणि इतर गोष्टी अशाच राहून गेल्या," असे मुख्यमंत्री म्हणाले.

मलाही दाढी म्हटलं जातं..

एकनाथ शिंदेंच्या दाढीवरुन राजकारणात चर्चा असते, याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, " सध्या दाढीची क्रेझ आहे.बाळासाहेब ठाकरेंचीदेखील दाढी होती. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची देखील दाढी आहे. आनंद दिघे यांची दाढी लोकप्रिय होती, त्यांना ठाण्याची दाढी बोललं जायचं. आता मलाही दाढी म्हटलं जातं,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT