Hemant Sorens Sarkarnama
देश

Hemant Sorens : मुख्यमंत्री सोरेन केंद्रातील मोदी सरकारवर भडकले; अख्खा देश अंधारात असेल, असा दिला इशारा

CM Hemant Soren PM Narendra Modi government center country darkness coal mines Jharkhand : झारखंड मुक्ती मोर्चाच्या 53व्या स्थापनादिनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केंद्रातील मोदी सरकारला इशारा दिला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन केंद्रातील मोदी सरकारवर चांगलेच भडकले आहे.

अख्खा देश अंधारात नको असेल, तर केंद्र सरकारने झारखंडच्या वाट्याचे 1.36 लाख कोटी रुपये द्यावे. हे पैसे मिळाले नाहीतर, अख्खा देश अंधारात जाईल, असा अशारा झारखंड मुक्ती मोर्चाच्या 53व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सभेत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी इशारा दिला.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी झारखंडाचे केंद्र सरकारकडे असलेल्या हक्क्याच्या पैशासाठी पत्रव्यवहार सुरू असून, संदेश देखील पाठवला आहे. झारखंडच्या हक्काचा पैसा मिळाला नाहीतर, आम्ही केंद्रातील मोदी सरकारविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहोत, असे म्हटले आहे.

या इशाऱ्यानंतर देखील केंद्रातील मोदी (Narendra Modi) सरकारने मागणीकडे लक्ष न दिल्यास झारखंडमधील कोळसा खाणी देखील बंद करू. यामुळे संपूर्ण देश अंधारात बुडेल. केंद्रातील मोदी सरकारची सापत्न वागणूक आता सहन करणार नाही, असेही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कोळसा मंत्री झारखंडमध्ये आले असताना, त्यांच्याशी झालेल्या चर्चेची देखील माहिती दिली. झारखंडमध्ये जमिनींचा भाव जास्त आहे, तो कमी करावा, असे प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. यावर जमीन आमची आहे, तर आम्हाला जेवढा दर वाटेल, तेवढा घेऊ, असे ठणकावून सांगितल्याचे सांगितले.

कोळसा कंपन्यांनी ज्या खाणींमधून उत्खनन बंद केले आहे, त्या जमिनी मूळ मालकांना परत कराव्यात. जमिनी परत न मिळाल्यास त्यावर कब्जा करण्याचा इशारा, हेमंत सोरेन यांनी दिला. झारखंड केंद्राने अर्थसंकल्पात काहीच दिले नाही. मनरेगाची रक्कम कमी केली. 50 लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात 12 लाख कोटी रुपये व्याजासह परत करावे लागणार आहे, अशी टीका सोरेन यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT