CM Jagan Mohan Reddy : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला दक्षिणेत बुस्टर डोस मिळणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोन रेड्डी यांच्या बहीण वायएस शर्मिला या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसला लोकसभेबरोबरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत शर्मिला यांच्यामुळे काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे.
शर्मिला (YS Sharmila) यांनी काही महिन्यांपुर्वीच वायएसआर तेलंगणा पक्षाची (YSR Telangana Party) स्थापना केली आहे. त्यांच्या पक्षाने तेलंगणाच्या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) पाठिंबा दिला होता. त्यांच्या पक्षाने मतविभाजन टाळण्यासाठी एकही उमेदवार उभा केला नव्हता. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. भारत राष्ट्र समितीची (BRS) सत्ता उलथवून टाकण्यात पक्षाला यश मिळाले. त्यानंतर काही दिवसांतच शर्मिला या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
येत्या गुरूवारी (ता. ४) शर्मिला आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू शकतात, अशी चर्चा आहे. त्याबाबत त्यांनी आज वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेसमध्ये जाण्याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. शर्मिला यांचे बंधु जगनमोहन हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असले तरी त्यांनी तेलंगणा राज्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तेलंगणामध्ये पक्ष स्थापन करताना शर्मिला यांच्या आईही उपस्थित होत्या. पण जगनमोहन यांनी तिथे जाणे टाळले होते. भावा-बहिणीमध्ये राजकीय भांडण टाळण्यासाठी त्यांनी तेलंगणामध्ये पक्षाची बांधणी केली. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आंध्र प्रदेशमध्येही भावाविरोधात निवडणूक प्रचारात त्यांना उतरवले जाऊ शकते. त्याचा फायदा काँग्रेसला मिळेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.