Mamata Banerjee Sarkarnama
देश

Mamata Banerjee : "महाकुंभ आता मृत्यू कुंभ..." ममता बॅनर्जींच्या 'त्या' वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरूवात

Mamata Banerjee on Prayagraj Kumbh Mela 2025 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Jagdish Patil

Mamata Banerjee on Maha Kumbh : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभबाबत (Maha Kumbh 2025) केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

महाकुंभ आता 'मृत्यू कुंभ'मध्ये बदलला असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. योगी आदित्यनाथ सरकारने महाकुंभमध्ये योग्य नियोजन केलं नसल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत, असं म्हणत त्यांनी योगींवर निशाणा साधला. त्या बंगाल विधानसभेत बोलत होत्या.

यावेळी बोलताना ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या, "महाकुंभ आता 'मृत्यू कुंभ'मध्ये बदलला आहे. मी महाकुंभाचा आदर करते, मी पवित्र माता गंगेचा आदर करते पण कोणतीही नियोजन नाही. श्रीमंत, VIP लोकांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतच्या तंबूची सोय करण्यात आली आहे.

मात्र, गरीबांसाठी कुंभमध्ये कोणतीही व्यवस्था नाही. अशा मेळाव्यांमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती सामान्य आहे, मात्र यासाठी व्यवस्था करणे महत्वाचे आहे. तुम्ही याचं काय नियोजन केलं आहे?", असा सवाल उपस्थित करत त्यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना ममता बॅनर्जी यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याच्या गैरव्यवस्थापनावरून योगी (Yogi Adityanath) सरकारवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, "तुम्ही देशाचे विभाजन करण्यासाठी धर्म विकता, मृत्यू प्रमाणपत्राशिवाय मृतदेह पाठवले म्हणून आम्ही येथे पोस्टमॉर्टम केले. या लोकांना भरपाई कशी मिळणार?"

कुंभला काही अर्थ आहे का?

दरम्यान, नुकतंच काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या चेंगराचेंगरीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी कुंभबाबात वादग्रस्त वक्तव्य केलं होते. "कुंभ फालतू आहे, त्याला काही अर्थ आहे का?" असं ते म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT