Manohar Lal Khattar 
देश

धक्कादायक : मुख्यमंत्र्यांनीच कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांविरोधात भडकवलं!

पाचशे ते हजार लोकांचे गट बनवून जशास तसे उत्तर देण्यासाठी भडकवल्याचं समोर आलं आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर वादात सापडले आहेत. भाजप किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पाचशे ते हजार लोकांचे गट बनवून जशास तसे उत्तर देण्यासाठी भडकवल्याचं समोर आलं आहे. तुरूंगात गेला तर मोठे नेते बनाल, असंही ते कार्यकर्त्यांना सांगत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना खट्टर यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, दक्षिण हरयाणामध्ये जास्त समस्या नाही. राज्याच्या उत्तर आणि पश्चिम जिल्ह्यांपर्यंत हे मर्यादित आहे. पाचशे, सातशे, हजार लोकांचे गट बनवा. त्यांना स्वयंसेवक करा आणि त्यानंतर ठिकठिकाणी जशास तसे उत्तर द्या, असं खट्टर म्हणाले आहेत. चिंता करू नका. जेव्हा तुम्ही तुरूंगात एक महिना, तीने महिने किंवा सहा महिने रहाल, तेव्हा मोठे नेते बनाल. इतिहासात नाव लिहिलं जाईल, असंही खट्टर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

लखीमपूर खीरी येथील घटनेनंतर खट्टर यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी हा व्हिडीओ ट्विट करून जोरदार टीका केली. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात भडकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तुमचा हा गुरूमंत्र कधीच यशस्वी होणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

भाजप समर्थक लोकांना आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर काठ्यांनी हल्ला करणे, तुरूंगात जाणे आणि तिथून नेते बनून बाहेर पडण्याचा तुमचा हा गुरूमंत्र यशस्वी होणार नाही. संविधानाची शपथ घेऊन खुल्या कार्यक्रमात अराजकता पसरवण्यासाठी केले जाणारे हे आवाहन देशद्रोह आहे. मोदीजी-नड्डा यांचीही सहमती असेल, अशी टीका सुरजेवाला यांनी केली आहे.

एका राज्याचा मुख्यमंत्रीच हिंसा पसरवण्यासाठी, समाजाला तोडण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याबाबत बोलत असेल तर कायदा आणि संविधानानुसार राज्याचा कारभार चालूच शकत नाही. आज भाजपच्या शेतकरीविरोधी षडयंत्राचा भांडाफोड झाला आहे. अशा अराजक सरकारला घालवण्याची वेळ आली आहे, असं टीकास्त्र सुरजेवाला यांनी सोडलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT