Jantar Mantar Protest News: दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपर लीक प्रकरण, परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे 'कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना टायफॉइड झाल्याचे निदान झाले आहे.
या वृत्तानंतर आंदोलनाच्या पुढील वाटचालीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, स्वतः अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ प्रसिद्ध करून आपल्या प्रकृतीची माहिती देतानाच आंदोलनाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली आहे.
व्हिडिओमध्ये अभिजीत दिपके यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना टायफॉइडची लागण झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले असून सध्या ते उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी आंदोलनाबाबतचा आपला निर्धार कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनासाठी तयार करण्यात आलेली समन्वयक टीम आणि स्वयंसेवक पुढील सर्व कार्यक्रम नियोजनानुसार सुरू ठेवतील. त्यामुळे आंदोलनाची दिशा किंवा तीव्रता कमी होणार नसल्याचा दावा दीपके यांनी केला.
व्हिडिओमध्ये अभिजीत दिपके यांनी सांगितले की, *"माझी प्रकृती सध्या ठीक नाही. मला टायफॉइडचे निदान झाले आहे. मात्र हा लढा माझा एकट्याचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळे मी काही दिवस विश्रांती घेतली तरी आंदोलन सुरूच राहील. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता येईपर्यंत आणि जबाबदारी निश्चित होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही."*
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, विविध संघटना आणि काही राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे. NEET पेपर लीकच्या मुद्द्यावरून आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, अभिजीत दिपके यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आल्याने आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अभिजीत दीपके उपचार घेत असले तरी आंदोलन पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सुरूच राहणार असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठीचा संघर्ष थांबणार नाही, असे आंदोलनाच्या आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.