PM Narendra Modi, Manmohan Singh Sarkarnama
देश

Manmohan Singh Funeral : मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवरून राजकारण? मोदींनी पहिल्या शिख पंतप्रधानाचा अवमान केल्याचा आरोप

Congress Accuses Narendra Modi Insulting manmohan singh : गृहमंत्रालयाकडून मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार हे सकाळी 11.45 वाजता निगम बोध घाटावर करण्यात येतील, अशी माहिती दिली आहे. अंत्यसंस्कारासाठी निगम बोध घाट दिल्याने काँग्रेस नेते नाराज झाले आहेत

Roshan More

Manmohan Singh Funeral : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (ता.26) वयाच्या 92 वर्षी निधन झाले. त्यांच्यावर आज (शनिवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा काँग्रेसच्या कार्यालयातून निघणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अंत्यसंस्कारासाठी अशी जागा द्या ज्या ठिकाणी स्मारक होऊ शकते, अशी मागणी केली होती. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी राजघाटमध्ये जागा मिळेल, अशी शक्यता होती.

गृहमंत्रालयाकडून मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार हे सकाळी 11.45 वाजता निगम बोध घाटावर करण्यात येतील, अशी माहिती दिली आहे. अंत्यसंस्कारासाठी निगम बोध घाट दिल्याने काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. जयराम रमेश यांनी ट्विट करत पंतप्रधान (नरेंद्र मोदी) यांनी शिख पंतप्रधानाचा मनमोहन सिंग यांचा अवमान केल्याचा आरोप केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, 'काँग्रेस अध्यक्षांनी प्रधानमंत्रीना पत्र लिहून प्रस्ताव दिला होता की माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह या अंत्यसंस्कार अशा जागेवर करण्यात यावे जेथे त्यांचे स्मारक होईल आणि त्यांचा वारसा जपला जाईल. पण अनेक दशकांपासून देशासाठी त्यांना केलेल्या उल्लेखनीय सेवेच्या अनुषंगाने भारत सरकारला जागा का सापडली नाही? हे आपल्या देशातील लोकांना समजू शकले नाही. हा भारताचे पहिले शीख पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे.'

काँग्रेसचा नेमका प्रस्ताव काय?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रातून अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा देण्याचे आवाहन केले आहे. तसेच मनमोहन सिंग यांचे स्मारक जिथे उभारता येईल, तिथेच अंत्यसंस्कार व्हावेत, असे पत्रात म्हटले आहे. खर्गे यांनी फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केल्याची देखील माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT