Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge sarkarnama
देश

Karnataka Assembly Elections : मल्लिकार्जुन खर्गेंना मारण्याचा भाजपचा डाव ? ; काँग्रेसचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

Mallikarjun Kharge Karnataka Assembly Elections News : कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या बुधवारी (ता.१०) होत आहे. काँग्रेस, भाजप, जेडीएसचे नेते प्रचारात मतदारसंघ पिंजून काढत आहे.

या प्रचारात भाजप उमेदवार हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याचा डाव रचत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप-काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे चित्तापुर विधानसभेच्या उमेदवाराने खर्गे आणि त्यांच्या परिवाराला मारण्याचा डाव रचला असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे. याबाबतची एक आँडिओ क्लिप समोर आली. यावरुन काँग्रेसने भाजपवर हे आरोप केले आहे.

रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकवली.त्यात त्यांनी दावा केला की, त्यात ऐकलेला आवाज कर्नाटकातील चित्तापूर मतदारसंघातील भाजप उमेदवार मणिकांत राठौरचा आहे. यामध्ये मणिकांत राठोड हे मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरत असून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्याची भाषा करत आहेत. 'सरकारनामा' या ऑडिओची पुष्टी करत नाही.

चित्तापुर विधानसभेची जागा महत्वाची आहे. २०१८ मध्ये येथे काँग्रेसच्या प्रियंका खर्गे या विजयी झाल्या होत्या. त्यांनी भाजपचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांचा ४ हजार ३९३ मतांनी पराभव केला होता. बसपाचे उमेदवार देवराजा वी हे तिसऱ्या क्रमांकावर होते. यंदा पुन्हा प्रियंका खर्गे या रिंगणात उतरल्या आहेत. यावेळी त्या ही जागा राखणार का, हे लवकरच कळेल.

कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात ऐन रंगात आला आहे.दरम्यान,त्याकरिता महाराष्ट्रातील भाजप आणि दोन्ही कॉंग्रेसचे मोठे नेते सीमाभागातील प्रचारात उतरले आहेत. कर्नाटकातील भाजपची राजवट घालवून आपली सत्ता आणण्याचा कॉंग्रेसने चंग बांधला आहे.

सीमा भागातील मराठी मतदारांची मते वळविण्यासाठी महाराष्ट्रातील मोठे नेते प्रचारात उतरले आहेत. सत्ता पुन्हा कायम राखण्यासाठी भाजपनेही महाराष्ट्रातील आपल्या मराठी नेत्यांची फौज सीमाभागात उतरवली आहे. तेथील नऊ मतदारसंघात मराठी मते निर्णायकी आहेत.

त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या कर्नाटकात निपाणी,बेळगाव, खानापूर या सीमाभागात तळ ठोकून आहेत. त्यांच्या मदतीला पिंपरी-चिंचवडमधील त्यांचे कट्टर समर्थक भोसरीचे आमदार महेश लांडगे हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT