Congress city president race Marathwada 35 candidates Sarkarnama
देश

Assembly Election Results : काँग्रेससाठी मोठी बातमी, 'या' राज्यात सत्ता स्थापन करणार, वेगाने बहुमताच्या दिशेने

Congress Alliance Tamil Nadu Keral : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होत असताना दोन राज्यांमध्ये काँग्रेस बहुमताच्या दिशेने आगेकूच करत असल्याचे दिसत आहे.

Roshan More

Congress News : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. या निकालांमध्ये काँग्रेससाठी दोन राज्यांमधून आनंदाची बातमी येत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडी केरळ आणि तमिळनाडूमध्ये आघाडीवर दिसत आहे.

केरळमध्ये तर बहुमताच्या आकड्या पलीकडे काँग्रेस जात असल्याचे दिसत आहे. सुरुवातीचे कल हे कायम राहतात असा अंदाज आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी या दोन राज्यात सरकार स्थापन करेल असे दिसते आहे.

तमिळनाडूमध्ये डीएमकेसोबत काँग्रेसची आघाडी आहे. डीएमकेला सुरुवातीच्या कलामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून 104 जागांवर आघाडीवर आहे.दरम्यान, अभिनेता विजयचा टीव्हीके पक्ष देखील वेगान पुढे जात आहे. त्यामुळे डीएमकेला तो मागे टाकण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, सुरवातीच्या कलांमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करताना दिसत असली तरी सकाळी 10 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होऊ शकते. मतमोजणी जसजशी पुढे जातील त्यानुसार कल अधिक स्पष्ट होतील आणि नेमके कोणाचे सरकार येणार हे समजू शकेल.

पश्चिम बंगालमध्ये काटे की टक्कर

पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काटे की टक्कर दिसून असून भाजप हा टीएमसीच्या पुढे आहे. दोन्ही पक्षांच्या जागांच्या आघाडीमध्ये फार फरक दिसून येत नाही. हे पोस्टल मतदान असल्याने पुढील एक तासात चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जाते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT