Jayant Chaudhary and Akhilesh Yadav  Sarkarnama
देश

अखिलेश यांच्यानंतर जयंत चौधरींची फोडाफोडीत आघाडी..भाजपसह काँग्रेसला दे धक्का!

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे.

सरकारनामा ब्युरो

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. भाजपला (BJP) तीन दिवसांत तीन मंत्री आणि सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) फोडाफोडीत आघाडी घेतली असली तरी त्यांच्या सहकारी पक्षाने आता भाजप आणि काँग्रेसचे दोन बडे नेते फोडून धक्का दिला आहे.

समाजवादी पक्षासोबत जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दल (RLD) पक्षाने फोडाफोडीत आघाडी केली आहे. समाजवादी पक्षाकडून भाजपला खिंडार पाडले जात असताना सहकारी पक्षानेही यात उडी घेतली आहे. भाजपचे आमदार अवतारसिंह भदाणा यांनी आरएलपीमध्ये प्रवेश केला आहे. भदाणा हे तीन वेळा खासदारही होते. त्यांना जेवार मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली जाणार आहे.

याचबरोबर काँग्रेसचे बडे नेते गजराजसिंह यांनी आरएलपीमध्ये प्रवेश केला आहे. हापूड मतदारसंघाचे सिंह यांनी चार वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला या भागात मोठा धक्का बसणार आहे. ते काँग्रेसच्या तिकिटावर हापूडमधून सात वेळा विधानसभा निवडणूक लढले आहेत. त्यातील चार वेळा ते निवडून आले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यांनी जयंत चौधरींची भेट घेऊन आज आरएलपीमध्ये प्रवेश केला.

ओबीसींचे मातब्बर नेते स्वामीप्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती, भगवती सागर आणि विनय शाक्य या आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला होता. यात मंत्री दारासिंह चौहान, आमदार मुकेश वर्मा आणि मंत्री धरमसिंह सैनी यांची भर पडली आहे. हे आठही जण मौर्य यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यानंतर आता आमदार भदाणा यांनी राजीनामा देऊन आरएलपीमध्ये प्रवेश केला आहे. मौर्य यांच्यानंतर इतर नेतेही पक्ष सोडण्याच्या मार्गावर असून, भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT