Farah Naeem Sarkarnama
देश

जिल्हाध्यक्षांकडून अश्लील शेरेबाजी; काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा राजीनामा

मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे उमेदवारच पक्ष सोडत असल्याने पक्षाला धक्का बसला आहे.

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या (Congress) अडचणी कमी होताना दिसत नाहीत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काही जणांनी निवडणूक लढण्यास थेट नकार दिला आहे. तर काहींनी पक्षाला सोडचिठ्ठी देत इतर पक्षातून उमेदवारी मिळवली आहे. एका महिला उमेदवाराने तर थेट जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप करत राजीनामा दिला आहे. महिलांचे शोषण होत असल्याचे पत्र त्यांनी सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पाठवले आहे.

काँग्रेसने सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) संपूर्ण जबाबदारी टाकली आहे. पण निवडणुकीआधीच त्यांच्या मोहरे हातातून निसटू लागल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे उमेदवारच आता साथ सोडत आहेत. आतापर्यंत चौघांनी पक्षाची उमदेवारी नाकारत इतर पक्षांचे तिकीट मिळवले आहे. (UP Election Update)

गुरूवारी शेखूपूर मतदारसंघातील उमेदवार फराह नईम (Farah Naeem) यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. याबाबतचे पत्र त्यांनी प्रियांका गांधी यांना लिहिलं आहे. काँग्रेसमध्ये आता महिलांचे शोषम होत आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ओमकार सिंह यांच्यावर कारवाई करावी, असं त्यांनी म्हटलं आहे. बदायूच्या संघटनेमध्ये महिला सुरक्षित नाही. जिल्हाध्यक्षांनी मुस्लिम महिलांना तिकीट देऊ नये, असे म्हणत आहेत. मी चरित्रहीन असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. (UP Election 2022)

माझ्यावर अनेक घाणेरडे आरोप करण्यात आले आहेत. मी काँग्रेसची सेवा केली, पण त्यांनी माझ्यावर असे आरोप केले. याचे खूप वाईट वाटते. ओमकार सिंह हे अनेकदा अश्लिल शब्द वापरतात. पण प्रियांका गांधी यांनी महिला लढू शकतात, हे दाखवून दिले. आता काँग्रेसचा राजीनामा देत मीही हे दाखवून देणार आहे. ओमकार सिंह यांनी माझे तिकीट कापण्यासाठी अनेक प्रयत्न केले असे नईम म्हणाल्या.

दरम्यान, तिकीट जाहीर झाल्यानंतर सर्वात आधी रामपुरमधील चमरौआ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार युसूफ अली यांनी पक्ष सोडला. त्यानंतर याच जिल्ह्यातील स्वार-टांडा मतदारसंघातील हैदर अली खान उर्फ हमजा मियां यांनी साथ सोडली. त्यानंतर बरेली कैंट येथील उमेदवार सुप्रिया ऐरन यांनी पक्षाल सोडचिठ्ठी दिली. तिघेही उमेदवारांची त्यांच्या भागात मोठा दबदबा आहे. पक्षाला अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवून दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT