Rahul Gandhi, Priyanka Gandhi  sarkarnama
देश

कॉग्रेस मोदींना घेरणार ; लखीमपूर खिरी हिंसाचारावरुन राष्ट्रपतींना भेटणार

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या 7 सदस्यीय शिष्टमंडळासह (congress delegation) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीची मागणी केली आहे. यासाठी राष्ट्रपतींना (ram nath kovind) पत्र लिहिलं आहे. लखीमपूर खिरी हिंसाचारातील वस्तूस्थिती कॉग्रेस राष्ट्रपतींसमोर मांडणार आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : लखीमपूर खिरी हिंसाचारानंतर (lakhimpur khiri violence) कॉग्रेने भाजपबाबत आक्रमकपणे भूमिका घेतली आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारामागे षंडयंत्र असल्याचा आरोप कॉग्रेसने केला आहे. याप्रकरणी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या 7 सदस्यीय शिष्टमंडळासह (congress delegation) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीची मागणी केली आहे. यासाठी राष्ट्रपतींना (ram nath kovind) पत्र लिहिलं आहे. लखीमपूर खिरी हिंसाचारातील वस्तूस्थिती कॉग्रेस राष्ट्रपतींसमोर मांडणार आहे. congress delegation led by rahul gandhi meet ram nath kovind lakhimpur khiri violence-mm76

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी भेटीसाठी पत्र लिहिले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या 7 सदस्यीय शिष्टमंडळासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीची मागणी केली आहे. खासदार मल्लिकार्जुन खर्गे, खासदार अधीर रंजन चौधरी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा, खासदार एके अँटनी, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि गुलाम नबी आझाद आदींचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार आहे.

लखीमपूर खेरी हिंसाचारात आंदोलक शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर ते दोन दिवस पोलीस कोठडीत होते. यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. लखीमपूर खेरी हिंसाचाराप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसआयटीने शनिवारी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला अटक केली. सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर त्याला शनिवारी मध्यरात्रीनंतर न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मृत शेतकरी लव्हप्रीत सिंहच्या नातेवाईकांची भेट घेतली. आशिषला लखीमपूर खेरी जिल्हा कारागृहात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यादव यांनी सांगितले की, आशिषच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज करण्यात आला होता आणि न्यायालयाने या अर्जावर सुनावणीसाठी 11 ऑक्टोबरला सुनावली होणार आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा याचा यांचा मुलगा आशिष आणि काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्या काही तरी बाचाबाची झाली आणि मग गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT