Congress  sarkarnama
देश

Haryana assembly : मोठी बातमी! काँग्रेसची पहिली यादी जाहीर, सकाळी प्रवेश करणाऱ्या खेळाडूलाही तिकीट

Roshan More

Haryana assembly : काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 31 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये आज (शुक्रवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या पैलवान विनेश फोगट यांनी तिकीट देण्यात आले आहे. तर, माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंग हुड्डा यांचे देखील नाव पहिल्या यादीत आहे.

कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनीया यांनी आज (शुक्रवारी) काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विनेश हिला जुलाना विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा यांना त्यांचा गड असणाऱ्या सांपला-किलोई विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

हरियाणा विधानसभेमध्ये 90 जागा आहेत. भाजपने 2019 विधानसभा निवडणुकीत 40 जागांवर विजय मिळवला होता. जेजेपी पक्षासोबत युती करत भाजप सत्तेवर आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने जेजेपीसोबतची युती तोडली. तसेच जेजेपी पक्षातील काही आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिला होता.

भाजपकडून आठ मंत्र्यांना संधी

भाजपकडून पहिली यादी चार सप्टेंबरला जाहीर केली होती. 67 जणांच्या या यादीत 17 आमदार आणि 8 मंत्र्यांना पुन्हा एकदा पक्षाने तिकीट दिले होते. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना कुरुक्षेत्र लाडवा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तिकीट न मिळाल्यामुळे भाजपमधील अनेक आमदारांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT