ghulam nabi azad, sonia gandhi, rahul gandhi
ghulam nabi azad, sonia gandhi, rahul gandhi sarkarnama
देश

मोठी बातमी : कॉग्रेसला खिंडार ; वीस नेत्यांचा राजीनामा

सरकारनामा ब्युरो

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस (congress) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या वीस नेत्यांनी एकाच वेळी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. कॉँग्रेसमध्ये जी-२३ (congress g 23) नावाने ओळखल्या जाणाऱ्या गटातील प्रमुख नेते गुलाम नबी आझाद (ghulam nabi azad) यांनी कॉँग्रेसला हा धक्का दिल्याचे बोललं जाते. हे वीस नेते पक्षनेतृत्व बदलाच्या निर्णयामुळे नाराज असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर पक्षाशी संबंधित मुद्द्यांवर त्यांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

जम्मू काश्मीरच्या चार माजी मंत्री, तीन आमदारांसह एकुण वीस जणांनी कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा दिल्याचे घोषित केलं आहे. हे सर्व नेते गुलाम नबी आझाद यांच्या जवळचे आहेत. या नेत्यांमध्ये जीएम सरोरी, जुगल किशोर शर्मा, विकार रसूल, नरेश कुमार गुप्ता, अन्वर भट यांचा समावेश आहे. सोनिया गांधींशिवाय या नेत्यांनी माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रदेश प्रभारी रजनी पाटील यांनाही राजीनाम्याच्या प्रती पाठवल्या आहेत.

या काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्याच्या काही दिवसांपूर्वी आझाद जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या नेत्यांनी प्रदेश काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधी वृत्तीमुळे हे पाऊल उचलले असल्याचा आरोप केला आहे. या वीस जणांच्या राजीनाम्यामागे गुलाम नबी आझाद यांचा 'हात' असल्याचे समजते. या राजीनाम्यामुळे पक्षश्रेष्ठींनी पक्षनेतृत्व बदलाबाबत इशारा असल्याचे समजले जाते.

जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर कॉग्रेसला हा मोठा झटका बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी राजीनामा देऊन इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे, परंतु काहींनी मौन बाळगण्याचा निर्णय घेतलाय. माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह आझाद यांच्या जवळच्या काही नेत्यांनी राजीनामा दिलेल्या नेत्यांपासून दुरावल्याचेही सूत्रांनी सांगितले. या नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्यात म्हटले की, त्यांनी त्यांच्या प्रश्नांकडे पक्षप्रमुखांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना वेळ देण्यात आला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT