Narendra Modi, Sonia Gandhi Sarkarnama
देश

Special Parliament Session : विशेष अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी काँग्रेसचा काय आहे 'सुपर प्लॅन'?

Sunil Balasaheb Dhumal

Delhi Political News : केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे सतराव्या लोकसभेचे १३ वे आणि राज्यसभेचे २६१ वे अधिवेशन असणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरू होणाऱ्या या विशेष अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. दरम्यान, या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीने सुपर प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे या विशेष अधिवेशनात घमासान होणार आहे. (Latest Political News)

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १८ सप्टेंबर रोजी राज्यसभेत ७५ वर्षांचा संसदीय प्रवास, उपलब्धी, अनुभव, आठवणी आणि धडे यावर चर्चा होणार आहे. उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी नवीन संसद भवनावर तिरंगा फडकावणार आहेत. यानंतर १९ सप्टेंबरपासून पुढील अधिवेशन नवीन संसदेत पूर्ण होईल. दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक झाली. या काळात विरोधकांनी महिला आरक्षण विधेयक मांडण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी जोरदार मागणी केली. बैठकीतील अनेक नेत्यांनी महिला आरक्षण विधेयक १५ दिवसांच्या विशेष अधिवेशनात मंजूर करावे, असे सांगितले. (Maharashtra Political news)

अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी नऊ मुद्द्यांची यादी तयार केली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा 'सुपर प्लॅन' तयार केला आहे. यात महागाई, पंतप्रधान किसान योजनेचा दुसरा हफ्ता, अदानीप्रकरणी 'जेपीसी' समितीची स्थापना, मणिपूर हिंसाचार, हरियाणा हिंसाचार, भारत-चीन सीमावाद, जातीनिहाय जणगणना, केंद्र आणि राज्य सरकारमधील वाद, नैसर्गिक आपत्तीबाबत सरकारची भूमिका या मुद्द्यांबाबत सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. आता हेच प्रश्न उपस्थित करून विरोधक सरकारची कोंडी करणार आहेत.

दरम्यान, नवीन अधिवेशनात पाच विषयांवर रणकंदन होण्याची शक्यता आहे. भारत नाव, चीनचा नवा नकाशा, एक देश-एक निवडणूक, अदानींबाबत हिंडेनबर्गचा अहवाल आणि मणिपूर हिंसाचार या मुद्द्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे.

  • भारत नावाबाबत वाद : बंगळुरूतील बैठकीत विरोधी आघाडीचे INDIA हे नाव जाहीर केले. या नावावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली. यानंतर आता देशाचे नाव INDIA नाव बदलून भारत करण्याची चर्चा आहे. दरम्यान, जी २० शिखर परिषदेतील निमंत्रण पत्रिकेत भारताचे राष्ट्रपती असा उल्लेख केला होता. तसेच पंतप्रधानांसमोर देशाच्या नावाच्या फलकावर भारत लिहिले होते. यावर विरोधकांच्या आघाडीला घाबरून सरकार देशाचे नाव बदलत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

  • चीनचा नवा नकाशा : चीनने २८ ऑगस्ट रोजी नवा नकाशा जारी केला होता. त्यात त्याने अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनला आपला भाग घोषित केले. मात्र, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी, चीन नेहमीच अशा कुरबुरी करतो, तर चीनने भारतात घुसखोरी केल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी केला होता. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलण्याची मागणीही त्यांनी केली.

  • एक देश-एक निवडणूक : केंद्र सरकारने 1 सप्टेंबर रोजी एक देश-एक निवडणुकीबाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासह आठ सदस्य आहेत. एक देश-एक निवडणूक लोकशाहीला घातक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. हाच मुद्दा विशेष अधिवेशनात विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे.

  • अदानी-हिंडेनबर्ग : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी करण्याबाबत विरोधक अधिवेशनात पुन्हा एकदा गोंधळ घालण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर काँग्रेस सातत्याने आवाज उठवत आहे. राहुल गांधी यांनी संसदेत अदानी आणि पंतप्रधानांचे फोटोही दाखवले होते.

  • मणिपूर हिंसाचार : मणिपूरमध्ये ३ मेपासून कुकी आणि मैतेई समुदायांमधील आरक्षणावरून हिंसाचार सुरू आहे. यात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले होते. आता पुन्हा विशेष अधिवेशनात विरोधक मणिपूरचा मुद्दा छेडण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT