Narendra Modi Retirement Sarkarnama
देश

Narendra Modi Retirement : दोघांनी आपापल्या झोळ्या उचला, मोदींसह भागवतांनाही काँग्रेसचा सल्ला

Congress leaders Jairam Ramesh and Pawan Khera suggest Narendra Modi and Mohan Bhagwat should consider retirement from active roles : दोघांच्या वाढदिवसांमध्ये केवळ सहा महिन्याचे अंतर असल्याने मोदींबरोबर मोहन भागवत यांनीही निवृत्त व्हावं असा चिमटा कॉंग्रेस नेत्यांनी काढला आहे.

Ganesh Sonawane

Narendra Modi retirement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राजकारणात वय वर्ष 75 पूर्ण केलेल्यांना दिलेल्या एका संदेशाची देशभरात चर्चा आहे. मोहन भागवत यांनी वयाचे 75 वर्ष पूर्ण करणाऱ्यांनी थांबून इतरांना संधी द्यायला हवी असा संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सप्टेंबर महिन्यात 75 वर्षांचे होणार आहेत. त्यामुळे भागवत यांनी पंतप्रधान मोदींनाच बाजुला होण्याचा सल्ला दिल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

संघाचे वरिष्ठ अधिकारी मोरोपंत पिंगळे यांच्या जीवनावर लिहिलेल्या 'द आर्किटेक ऑफ हिंदू रिसर्जन्स' या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितलं की, मोरोपंत 75 वर्षांचे झाले होते, त्यावेळी वृंदावनला झालेल्या संघाच्या बैठकीत त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार मोरोपंतांना शाल घालून सन्मानित केलं होतं. त्यावेळी मोरोपंत म्हणाले होते की, जेव्हा तुम्ही 75 वर्ष पुर्ण करतात आणि तुम्हाला शाल पांघरली जाते त्याचा एक अर्थ असतो. याचा अर्थ तो म्हातारा झाला असून आता इतरांना संधी दिली पाहीजे असं मोरोपंत म्हणाले होते अस भागवतांनी सांगितलं.

भागवत यांनी दिलेल्या या संदेशावरुन आता कॉंग्रसने संधी साधली आहे. दोघांच्या वाढदिवसांमध्ये केवळ सहा महिन्याचे अंतर असल्याने मोदींबरोबर मोहन भागवत यांनीही निवृत्त व्हावं असा चिमटा कॉंग्रेस नेत्यांनी काढला आहे.

कॉंग्रेस नेते पवन खेरा यांनी दोघांनी आपापल्या झोळ्या उचला आणि एकमेकांना मार्गदर्शन करायला जा असा सल्ला दिला आहे. तर कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनीही एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील भागवत यांना आठवण करुन देऊ शकतात की येत्या 11 सप्टेंबर ला तेही 75 वर्षांचे होत आहेत.

जयराम रमेश यांनी एक्सपोस्ट करत मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, पाच दिवसांचा दौरा पूर्ण करुन मोदी भारतात आले आहेत. बिचारे पंतप्रधान पुरस्कार जिंकून भारतात परतले आहेत. आणि ही त्यांची अशीकशी घरवापसी आहे कारण की, ते परत येताच सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांना ते 17 सप्टेंबर 2025 रोजी 75 वर्षांचे होत आहेत अशी आठवण करुन दिली आहे. पण पंतप्रधान सरसंघचालकांना हे देखील सांगू शकतात की ते देखील 11 सप्टेंबर 2025 रोजी 75 वर्षांचे होतील ! एक तीर, दो निशाने! अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

दरम्यान शिवसेना(उबाठा)खासदार संजय राऊत यांनीही यावरुन खोचक टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी अडवाणी, मुरली मनोहर, जसवंत सिंह यांसारख्या मोठ्या नेत्यांना निवृत्त होण्यास भाग पाडले होते. आता मोदी स्वतः ते पाळतात की नाही ते पाहुया असं राऊत यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT