नवी दिल्ली : देशात सत्ताधारी भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (Congress) असा सामना दररोज रंगत आहे. परंतु, आता काँग्रेसने भाजप सरकारमध्ये सहभागी होऊन सगळ्यांनाच धक्का दिला आहे. हा प्रकार मेघालयमध्ये घडला असून, यामुळे भाजपचे सरकार तरले आहे. मेघालयमधील भाजपच्या आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आता घटक पक्ष बनला आहे.
मेघालयमध्ये (Meghalaya) भाजप व नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) या पक्षांची आघाडी असून त्यांची सत्ता आहे. दररोज एकमेकांवर तुटून पडणारे भाजप आणि काँग्रेस बदलती राजकीय समीकरणे पाहून या राज्यात एकत्र आले आहेत. देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजप आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी 17 आमदारांसह पक्षाला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसऐवजी आता तृणमूल प्रमुख विरोधी पक्ष आहे.
मेघालयमध्ये काँग्रेसचे संख्याबळ पाचवर आले आहे. सुरवातीला काँग्रेसने भाजप सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. आता भाजपप्रणित मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्समध्ये (MDA)सहभागी होण्याचा मोठा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अम्पारीन लिंगडोह यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांना दिले आहे. अम्पारीन लिंगडोह यांच्यासह मोहेंद्रो राप्सांग, मायरालबॉर्न सियेम, किम्फा मारबानियानिंग आणि पी.टी.स्वॉक्मी या आमदारांच्या या पत्रावर सह्या आहेत.
पत्रात म्हटले आहे की, आम्ही पत्रावर सह्या केलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी एमडीए सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही मुख्यमंत्री आणि एमडीए सरकारला पाठिंबा देत आहोत. सरकारचे हात आणखी बळकट व्हावेत, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. यामुळे सरकारला अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेता येतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.