Devendra Fadnavis, Yogi Adityanath Sarkarnama
देश

Lok Sabha Election : 6 महिन्यांत ते वर्षभरात मध्यावधी निवडणुका..., माजी मुख्यमंत्र्यांचं फडणवीस-योगींचं नाव घेत मोठं विधान

India Politics : "देवेंद्र फडणवीस राजीनामा देत होते, योगींची खूर्ची डळमळीत झालीय, राजस्थानच्या भजनलाल शर्मांची खूर्ची डगमगतेय. सर्व मुख्यमंत्र्यांच्या खूर्च्या डगमगू लागल्या आहेत."

Jagdish Patil

Lok Sabha Election : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देत आहेत, योगीजींची खुर्ची डळमळीत झाली आहे. भजनलाल शर्माही डगमगले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनो तयार रहा, येत्या 6 महिन्यात ते वर्षभरात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असा मोठा दावा छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीचा निकाल समोर आला, त्यानंतर नरेंद्र मोदी एनडीएच्या साथीने सरकार स्थापन करत आहेत. येत्या 9 जून रोजी ते तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मात्र, यंदाच्या लोकसभेचा निकाल भाजपला अपेक्षित असा लागलेला नाही. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये भाजपची चांगलीच पीछेहाट झाली आहे. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर पक्षाकडे थेट सरकारमधून मोकळं करण्याची विनंती केली आहे.

याबाबत त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे, फडणवीस (Devendra Fadnavis) राजीनामा देत होते, योगींची खूर्ची डळमळीत झालीय, राजस्थानच्या भजनलाल शर्मांची खूर्ची डगमगतेय. सर्व मुख्यमंत्र्यांच्या खूर्च्या डगमगू लागल्या आहेत. सरकार बनलं नाही नितीश कुमारांचे प्रवक्ते अग्निवीर योजना बंद करा म्हणत आहेत.

जातनिहाय जनगणनेची मागणी करतायत, राहुल गांधी यांनी पण जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच जदयूच्या प्रवक्त्यांनी यूसीसीची गरज नसल्याचं म्हटलं आहे. यांचं सरकार बनलं नाही तोपर्यंत भांडण सुरु झालं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो तयार राहा, येत्या सहा महिन्यात ते एका वर्षात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असा दावा बघेल यांनी केला आहे.

दरम्यान, एका दिवसात तीन वेळा कपडे बदलणारे एकाच ड्रेसवर कार्यक्रम करत आहेत. पार्टी तोडणारे, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकणाऱ्यांना, धमक्या देणाऱ्यांना मतदारांनी चांगला धडा शिकवला आहे, असं म्हणत भूपेश बघेल मोदींवर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT