Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge sarkarnama
देश

EDकडून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची चैाकशी सुरु

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED)काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge)यांना समन्स बजावले आहे. आज (सोमवारी) सकाळी अकरा वाजेपासून त्यांची चैाकशी सुरु आहे.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये कोर्टासमोर ही तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा तपास सुरु आहे. (National Herald Case)

काँग्रेस नेत्यांनी यंग इंडिया लिमिटेड कंपनी अंतर्गत असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड विकत घेतल्याचा आरोप करत 2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. 'यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड' ने केवळ 50 लाख रुपयांपैकी 90.25 कोटी रुपये वसूल करण्याचा उपाय शोधला आहे, जो नियमांच्या विरुद्ध आहे. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, 50 लाख रुपयांमध्ये नवीन कंपनी स्थापन करून, 'AJL'ची 2000 कोटी रुपयांची मालमत्ता स्वत:ची बनवण्याची चाल खेळली गेली,'' असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होते.

दिल्लीच्या एका न्यायालयाने या खटल्यातील चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि 26 जून 2014 रोजी, न्यायालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले. ज्यात सॅम पित्रोदा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि मोतीलाल व्होरा यांना नवीन कंपनीत संचालक म्हणून नियुक्त केले होते.

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल लिमिटेड अर्थात 'एजेएल' च्या मालकीचे होते ज्याने आणखी दोन वृत्तपत्रे प्रकाशित केली. हिंदीत 'नवजीवन' आणि उर्दूमध्ये 'कौमी आवाज'. स्वातंत्र्यानंतर, 1956 मध्ये, असोसिएटेड जर्नलची स्थापना एक गैर-व्यावसायिक कंपनी म्हणून करण्यात आली आणि कंपनी कायद्याच्या कलम 25 अंतर्गत ती करमुक्तही होती.

काय आहे प्रकरण

  • 2008 मध्ये 'एजेएल'ची सर्व प्रकाशने निलंबित करण्यात आली आणि कंपनी 90 कोटींच्या कर्जात बुडाली.

  • काँग्रेस नेतृत्वाने 'यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड' नावाची एक नवीन गैर-व्यावसायिक कंपनी स्थापन केली.

  • सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रोदा यांना संचालक करण्यात आले.

  • नवीन कंपनीतील 76 टक्के शेअर्स सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे आहेत, तर उर्वरित 24 टक्के शेअर्स इतर संचालकांकडे आहेत.

  • काँग्रेस पक्षानेही या कंपनीला 90 कोटींचे कर्ज दिले. या कंपनीने 'एजेएल' विकत घेतले.

  • भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये काँग्रेस नेत्यांवर फसवणूक केल्याचा आरोप करत याचिका दाखल केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT