Gautam Adani, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : गौतम अदानींना आजच अटक करा! राहुल गांधींचा हल्लाबोल...

Gautam Adani Corruption America Court Congress : गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत फसवणूक आणि लाचप्रकरणात खटला दाखल करण्यात आला आहे.

Rajanand More

New Delhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार शरसंधान साधले. अमेरिकेत अदानींवर फसवणूक आणि लाचप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर राहुल यांनी गुरूवारी अदानींना आजच अटक करण्याची मोठी मागणी केली. चौकशीमध्ये मोदींचेही नाव समोर येईल, असा मोठा दावाही त्यांनी केला आहे.

अदानींवरील आरोपांनंतर राहुल गांधी यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, नरेंद्र मोदींनी एक नारा दिला आहे, एक है तो सेफ है. भारतात अदानी आणि मोदीजी एकत्र आहेत तर सेफ आहेत. मुख्यमंत्री 10-15 कोटींसाठी जेलमध्ये जातात. अदानी दोन हजार कोटींचा घोटाळा करतात, तरी ते बाहेर आहेत. पतप्रधान मोदी त्यांचे संरक्षण करत आहेत.

अदानींनी अमेरिकेत गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. पण भारतात त्यांच्याविरोधात काहीच होत नाही. अदानींना आजच अटक करायला हवी. माधवी बूच यांना हटवून त्यांचीही चौकशी करायला हवी, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. तसेच आम्ही हा मुद्दा संसदेतही उचलून धरणार आहोत. पंतप्रधान शंभर टक्के या व्यक्तीचे संरक्षण करत आहेत. या व्यक्तीने भ्रष्टाचार करून भारताची संपत्ती घेतली आहे. ते भाजपचे समर्थन करतात. आमची जेपीसीची मागणी आहे, असे राहुल म्हणाले.

आम्ही नेटवर्क एक्स्पोज करून देशाला दाखवून देऊ. कारण यामध्ये एक व्यक्ती नाही, अनेक जण आहेत. त्याची साखळी आम्ही एक्स्पोज करू. जेपीसी व्हायलाच हवी, पण आता प्रश्न आहे की, अदानी जेलच्या बाहेर का आहेत? कुणी गुन्हा केला तर त्याला जेलमध्ये टाकू असे मोदी म्हणतात. पण ते इथे काहीच करू शकत नाहीत. कारण ते अदानींच्या नियंत्रणात आहेत. त्यामुळे त्यांची चौकशीही होणार नाही आणि अटकही होणार नाही, याची गॅरंटी असल्याचेही राहुल म्हणाले.

पंतप्रधानांची विश्वासार्हता संपली आहे. संपूर्ण सरकार पंतप्रधान नियंत्रित करत आहेत. आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. आम्ही माधवी बूच यांना यापूर्वीच एक्स्पोज केले आहे. यामध्ये सहभाग असलेल्या इतरांनाही हळूहळू एक्स्पोज करू. आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्यावर काम करत आहोत. काँग्रेससह इतर पक्षही काम करत आहेत. देशाला संपूर्ण नेटवर्क दाखवून देऊ, हे कोण आहेत, कुठे बसले आहेत? मोदीजी जिथे जातात तिथे भारत सरकारच्या विश्वासार्हता पणाला लावून अदानींनी काम मिळवून देतात, असा हल्लाबोल राहुल यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT