Rahul gandhi  Sarkarnama
देश

Rahul Gandhi Granted Bail: मोठी बातमी! राहुल गांधींना जामीन मंजूर

Rahul Gandhi Defamation Case: भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती

सरकारनामा ब्युरो

BJP-Congress Politics: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरत सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी एका सभेत मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतल जामीनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयात झालेल्या सुनवाणीत राहुल गांधींना जामीन मंजूर झाला आहे.

13 एप्रिल 2019 रोजी, कोलार, कर्नाटक येथे लोकसभा निवडणुकीदरम्यान, राहुल गांधींनी एका सभेत मोदी आडनावाबाबत विधान केले. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे, असे गांधींनी म्हटले होते. या प्रकरणी भाजपचे आमदार आणि गुजरात सरकारचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती.23 मार्च रोजी सुरत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी (CJM) HH वर्मा यांच्या न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली.

दरम्यान, आजच्या सुनावणीसाठी देशभरातून काँग्रेसचे स्थानिक ते राष्ट्रीय स्तरापर्यंतचे नेते न्यायालयात उपस्थित होते. राहुल गांधींसोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी तसेच राजस्थानचे काँग्रेसचे अशोक गेहलोत, छत्तीसगडचे भूपेश बघेल आणि हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे तीन मुख्यमंत्री, यासोबतच राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते सुरतमध्येच दाखल झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT