काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. दोन मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांना 14 दिवसांच्या आधी एक जागेची निवड करावी लागते.
दोन्हींपैकी एका जागेची निवड करण्यासाठी राहुल गांधींकडे ( Rahul Gandhi ) फक्त 48 तास म्हणजे एक दिवसाचा कालावधी उरला आहे. त्यामुळे एका मतदारसंघातून राहुल गांधींना राजीनामा देत लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करावा लागणार आहे.
उत्तर प्रदेशातील रायबरेली या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघातून राहुल गांधी यांचा 3 लाख 90 हजार तर केरळमधील वायनाड मतदारसंघातून 3 लाख 64 हजारांच्या मताधिक्यानं विजय झाला आहे. त्यामुळे रायबरेली की वायनाड यातील एक मतदारसंघाची निवड राहुल गांधींना करावी लागणार आहे. पण, राहुल गांधी कुठल्या मतदारसंघातून राजीनामा देणार, याबाबत अद्यापही 'सस्पेन्स' कायम आहे.
पण, राहुल गांधी रायबरेली मतदारसंघात सोडणार नाही, असा दावा उत्तर प्रदेश काँग्रसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी केला होता. निवडून आल्यानंतर राहुल गांधी वायनाडला गेले होते. कुठल्या मतदारसंघाची निवड करावी, यासाठी मी गोंधळून गेल्याचं राहुल गांधींनी सांगितल होतं. पण, मी घेतलेल्या निर्णयानं रायबरेली आणि वायनाडमधील कार्यकर्ता खूश होतील, असंही राहुल गांधींनी म्हटलं होतं.
काय आहे नियम?
अधिनियम 1951 कलम 68 ( 1 ) नुसार दोन मतदारसंघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीनं 14 दिवसांनी एका जागेचा राजीनामा द्यावा लागतो. 4 जूनला निवडणुकीचे निकाल हाती आले होती. त्यामुळे दोन मतदारसंघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना राजीनामा देण्याची अंतिम मुदत 18 जून आहे.
राजीनामा दिला नाहीतर काय होणार?
नियमांनुसार लोकप्रतिनिधीनं 14 दिवसांत एका जागेवरून राजीनामा नाही दिला, तर त्यांचे सदस्यत्व रद्द होते. तसेच, दोन्ही जागा रिक्त मानल्या जातात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.