Congress Latest Marathi News, Congress News
Congress Latest Marathi News, Congress News  Sarkarnama
देश

विधानसभेची पुढची निवडणूक माझी शेवटची; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

सरकारनामा ब्युरो

म्हैसूर : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी २०२३ ची विधानसभा निवडणूक आपली शेवटची निवडणूक असले असे जाहीर केले आहे. त्यानंतर आपण कोणतीही निवडणूक लढणार नाही, राज्यसभेसाठी देखील उभे राहणार नाही, असे जाहीर केले आहे. सत्तेत असणाऱ्या धर्मांध आणि भ्रष्टाचारी पक्षाला खाली खेचण्यासाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले. (Siddaramaiah | Congress | Latest News Marathi)

त्याचप्रमाणे पुढील निवडणूक आपण चामुंडेश्वरी मतदार संघातून लढणार नसल्याचे देखील त्यांनी जाहिरात केले. ‘चामुंडेश्वरीच्या मतदारांनी २०१८ साली मला पराभूत करून माझी साथ सोडली पण बदामीच्या लोकांनी मला हात दिला. त्यामुळे मी यापुढे मी कधीच चामुंडेश्वरीतून निवडणूक लढणार माझी हे तुम्ही ध्यानात ठेवा’ असे सिद्धरामय्या म्हणाले.

आपल्या पराभवाचे खापर विरोधकांवर आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांवर फोडत सिद्धरामय्या म्हणाले, ‘विरोधकांनी केलेला अपप्रचार आणि पक्षांतर्गत काही शक्तींमुळे आपल्याला निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला’. सिद्धरामय्या यांना २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पारंपरिक चामुंडेश्वरी मतदार संघातून पराभव पत्करावा लागला होता. जनता दल सेक्युलरच्या जी. टी. देवेगौडा यांनी यांनी त्यांचा ३० हजार ४२ मतांनी पराभव केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT