Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates, Hardik Patel Latest News in Marathi Sarkarnama
देश

राजकारण तापलं! हार्दिक पटेलांना भाजप प्रवेशाआधी काँग्रेसनं पाडलं उघडं

हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार

सरकारनामा ब्युरो

अहमदाबाद : गुजरात (Gujarat) काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पक्षाला रामराम केला आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पटेल हे भाजप अथवा आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. ते उद्या (ता.२) भाजपमध्ये दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं हार्दिक पटेल यांच्यावर हल्लाबोल करीत त्यांना उघडं पाडलं आहे. (Hardik Patel Latest News)

हार्दिक पटेल हे सहा महिन्यांपासून भाजपच्या संपर्कात होते, असा गौप्यस्फोट काँग्रेसनं केला आहे. याबद्दल बोलताना गुजरात काँग्रेसचे प्रभारी रघू शर्मा म्हणाले की, हार्दिक पटेल हे आधीपासूनच भाजपच्या संपर्कात होते. आम्ही सहा महिन्यांपासून हे सगळं पाहत होतो. पक्षात ते सेलिब्रिटी असल्याप्रमाणे काम करीत होते. पक्षाच्या कार्यक्रमांना ते फक्त हजेरी लावत. पक्षाच्या कार्यक्रमाला केवळ हजेरी लावायची आणि भाषण करुन निघून जायचे, असा त्यांचा शिरस्ता होता. त्यांनी पक्षाच्या मंचावर आणि कार्यक्रमात येऊन सहभागी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. परंतु, त्यांचे वागणे सुधारले नाही.

हार्दिक पटेल हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांच्या गुप्त बैठका दोन महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा होती. यामुळे काँग्रेसला रामराम केल्यानंतर विधानसभा निवडणुकीआधी ते भाजप किंवा आपमध्ये उडी मारतील, असे बोलले जात होते. अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्याच त्यांचा पक्षप्रवेश असून, काँग्रेसने आता त्यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे.

हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे ट्विट करीत जाहीर केले होते. ते म्हणाले होते की, आज मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातची जनता स्वागत करेल. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT