Karanataka Election  Sarkarnama
देश

Karanataka Election Result : काँग्रेस ११० जागांवर आघाडीवर भाजपची पिछेहाट; कुमारस्वामी किंगमेकरच्या भूमिकेत?

सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : कर्नाटक (Karnataka) विधानसभेचे निकाल आज सकाळपासून हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलामध्ये काँग्रेसने ११० जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी भाजपची मात्र पीछेहाट झाली असून ते ८० जागांवर आघाडीवर आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाने निर्णायक २९ जागांवर आघाडी मिळविली आहे. बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता असून काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र, सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता आहे. (Congress leads in 110 seats, BJP retreats; Kumaraswamy as Kingmaker)

मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने (Congress) १३० जागांवर आघाडी घेतली होती. मात्र, सध्या आकडे स्थिरावत असून काँग्रेस ११० च्या आसपास फिरत आहे. भाजपही (BJP) ८० जागांच्या आसपास आहे, त्यामुळे जेडीएस महत्वाच्या भूमिकेत येण्याची शक्यता आहे. कारण, हे कल आता स्थिरावत आहेत. त्यामुळे जेडीएसचे कुमारस्वामी यांना पुन्हा महत्व येण्याची शक्यता आहे.

सिंगापूरला गेलेले कुमारस्वामी आज सकाळीच बंगळूरमध्ये पोचले आहेत. सुरुवातीचे कल हाती आल्यानंतर कुमारस्वामी हे थेट मंदिरात पोचले होते. त्याठिकाणी देवदर्शन करून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यामुळे कुमारस्वामी हे किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मराठी भाषिकाच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार सध्या पिछाडीवर आहेत, त्यामुळे एकीकरण समितीमध्ये सध्या सामसूम दिसत आहे. सध्या आकडे बदलत असून त्यात कमी जास्त होत आहेत

काँग्रेसने आपल्या आघाडीवरील उमेदवारांशी संपर्क साधून त्यांना एकत्र आणून अज्ञातस्थळी आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास आपल्या आमदारांना भाजप गळाला लावू नये, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT