Congress News : विधानसभा निवडणुकीत फक्त केरळमध्ये काँग्रेस आघाडीची सत्ता आली आहे. तर, बाकी चार राज्यांमध्ये काँग्रेसचा सपाटून पराभव झाला. दरम्यान, तमिळनाडूमध्ये काँग्रेस डीएमकेसोबत होती. मात्र डीएमके काँग्रेस आघाडीचा पराभव झाला. काँग्रेसचे पाच आमदार विजयी झाले आहेत.
तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 117 जागांची आवश्यकता आहे. अभिनेता विजयच्या टीव्हीके १०८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यांना सत्ता स्थापनेसाठी आणखी 9 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेस डीएमकेची साथ सोडून टीव्हीकेसोबत जाणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेसला दोन मंत्रिपदे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. विजयने खरी काँग्रेस आमच्यासोबत असल्याचे निवडणूक प्रचारात सांगितले होते. दरम्यान, काँग्रेस सत्तेत सहभागी होत असले तर त्यांची स्वार्थी वृत्ती दिसून येईल, अशी टीका डीएमकेने केली आहे. तसेच काँग्रेसचे जे पाच आमदार निवडणून आले आहेत ते डीएमकेमुळेच आले आहेत, असा दावा देखील डीएमकेने केला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते गिरीश चोडणकर आणि प्रवीण चक्रवती हे टीव्हीकेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
निवडणुकीच्याआधी राहुल गांधी यांनी काँग्रेसने अभिनेता विजय याच्यासोबत युती करावी, असे मत मांडले होते. मात्र, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी हा निर्णय दिल्लीतून न घेता स्थानिक पातळीवर घ्यावा, असे सांगितले होते. त्यानंतर स्थानिक पातळीवर विजय याच्यासोबत न जाता डीएमकेसोबत राहण्याचा निर्णय स्थानिक काँग्रेस नेत्यांनी घेतला होता. दरम्यान
डीएमकीची साथ सोडून टीव्हीकेला पाठींबा देण्यापूर्वी काँग्रेसने टीव्हीकेला अट घातली आहे. विजय यांचा पक्ष भाजप प्रणित एनडीए आघाडीत सहभागी होणार नाही. तसेच प्रादेशिक पातळीवर अण्णा द्रवीड मुनेत्र कळघम यांच्यासोबत युती करणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.