Ashwin Kotwal Sarkarnama
देश

काँग्रेसला दे धक्का; अश्विन कोतवाल यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

सरकारनामा ब्युरो

अहमदाबाद : काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. आमदार अश्विन कोतवाल (Ashwin Kotwal) यांनी आमदारकीसह पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यातच एका बड्या नेत्यानं काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यानंतर आठवडाभरातच पक्षाला दुसरा धक्का बसला आहे.

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेसला मागील आठवड्यात मोठा धक्का दिला होता. काँग्रेसचे माजी आमदार मणिलाल वाघेला (Manilal Vaghela) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं तिकीट न दिल्यानं ते नाराज होते. मागील वर्षीच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता आदिवासी नेते म्हणून ओळख असलेले कोतवालही भाजपच्या वाटेवर आहेत.

कोतवाल यांच्याबाबत मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने ते नाराज होते. भाजपनेही याबाबत अधिकृत घोषणा करत कोतवाल यांचा मंगळवारी पक्षप्रवेश होईल, असं म्हटलं आहे. यावर बोलताना कोतवाल म्हणाले, मी 2007 पासून गुजरामध्ये काँग्रसेचा आमदार म्हणून काम करत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काम करण्याची पध्दत ते मुख्यमंत्री असल्यापासून पाहत आहे. मी तेव्हापासून प्रभावित झालो होतो. पण विचारधारेमुळे काँग्रेसमध्ये होतो. पण आता आदिवासींचा विकास करायचा आहे. त्यामुळे भाजपमध्ये जात आहे.

दरम्यान, गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वडगाव शहरात झालेल्या विजय विश्वास संमेलनात वाघेला यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. वाघेला यांनी 2012 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर वडगावमधून विजय मिळवला होता. नंतर 2017 मध्ये त्यांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं होतं. काँग्रेसनं त्यावेळी अपक्ष उमेदवार आणि दलित नेता जिग्नेश मेवानी यांना समर्थन दिले होते. त्यावेळी मेवानी यांनी भाजपच्या आमदाराचा पराभव केला होता.

गेल्या अनेक वर्षांपासून वाघेला काँग्रेसमध्ये होते. त्यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात पक्षाचा राजीनामा दिला होता. मेवानी यांच्यामुळे पक्षाकडून डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मेवानी हे प्रक्षोभक भाषणे करीत असून, दलितांचा राजकारणासाठी वापर करीत असल्याचा आरोप करीत याला वाघेलांनी आक्षेप घेतला होता. मेवानी यांच्यामुळे वाघेला हे अनेक दिवस नाराज होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT