Karnataka Assembly

 

Sarkarnama

देश

बलात्कारापासून वाचू शकत नसाल, तर आनंद घ्या! आमदाराचं विधानसभेतच संतापजनक वक्तव्य

विशेष म्हणजे या वक्तव्यावर अध्यक्षांसह भाजप व इतर पक्षातील आमदारांनीही आक्षेप घेतला नाही.

सरकारनामा ब्युरो

बेंगलुरू : वादग्रस्त वक्तव्यांनी सतत प्रकाशझोतात राहणारे कर्नाटक विधानसभेचे (Karnataka Assembly) माजी अध्यक्ष आणि काँग्रेस (Congress) ज्येष्ठ आमदार के. आर. रमेश कुमार (K R Ramesh Kumar) पुन्हा एकदा वादात अडकले आहे. गुरूवारी विधानसभेमध्ये त्यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. जर बलात्कारापासून (Rape) वाचू शकत नसाल, तर झोपा आणि त्याचा आनंद घ्या, असं विधान रमेश कुमार यांनी केलं आहे.

विशेष म्हणजे त्यावर विधानसभेचे अध्यक्ष व सत्ताधारी भाजपचे (BJP) आमदारही काही बोलले नाहीत. उलट रमेश कुमार यांच्या विधानावर विधानसभेचे अध्यक्ष हसत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असल्याने आणखी संताप व्यक्त केला जात आहे. गुरूवारी विधानसभेमध्ये पाऊस आणि पुरामध्ये झालेल्या नुकसानीवर चर्चा सुरू होती. यावेळी काही आमदार आपल्या भागातील लोकांना झालेल्या त्रासाची माहिती देऊ इच्छित होते.

विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याजवळ कामकाजासाठी मात्र फारसा वेळ नव्हता. त्यांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत चर्चा पूर्ण करायची होती. तर आमदार वेळ वाढवून देण्याची मागणी करत होते. त्यानंतर कागेरी हसत हसत म्हणाले की, मी आता अशा स्थितीत आहे की, जिथे मला केवळ आनंद घेत हा-हा म्हणायचे आहे. ठीक आहे. मला आता असे वाटते, की समोरील स्थिती नियंत्रित करणे सोडून द्यावे. तुम्ही सगळ्यांनी आपले म्हणणे मांडावे, असे मला सगळ्यांना सांगावेसे वाटते.

रमेश कुमार यांनी यावर आक्षेप घेत म्हटलं की, 'एक म्हण आहे, जेव्हा बलात्कार होणारच असेल, तर झोपा आणि आनंद घ्या. तुम्ही अशाच स्थितीत आहात.' रमेश कुमार यांच्या विधानावर कागेरी यांच्यासह सभागृहातील सत्ताधारी भाजपसह इतर पक्षांतील एकाही आमदाराने आक्षेप घेतला नाही. विशेष म्हणजे कागेरी हे कुमार बोलत असताना हसत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT