Yusuf Sharif
Yusuf Sharif  Sarkarnama
देश

काँग्रेसचे उमेदवार पावणेदोन हजार कोटींचे मालक अन् म्हणतात, सगळी संपत्ती कायदेशीर!

Sanjay Jadhav

बंगळूर : विधान परिषदेच्या (Legislative Council) निवडणुकीची धामधूम कर्नाटकात (Karnataka) सुरू आहे. बंगळूर शहर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी काँग्रेसने (Congress) युसूफ शरीफ (Yusf Sharif) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शरीफ यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली असून, ती ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावर शरीफ यांनी त्यांची सगळी कायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

शरीफ हे अब्जाधीश आहेत. ते सुरवातीला भंगार व्यावसायिक होते. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आता त्यांची संपत्ती जाहीर केली असून, त्यांची एकूण मालमत्ता 1 हजार 744 कोटी रुपये आहे. शरीफ हे भंगारवाले या नावाने परिचित आहेत. परंतु, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पक्षीय वर्तुळात त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

शरीफ यांच्या संपत्तीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्याने अखेर त्यांनी यावर खुलासा केला आहे. ते म्हणाले की, मी माझ्या प्रत्येक मालमत्तेची खरेदी आणि विक्री ही कायदेशीर पद्धतीने करतो. संपत्तीचा सर्व तपशील मी दिला असून, प्रत्येक गोष्टीचा कर मी भरला आहे. मी खरेदी आणि विक्रीचे व्यवसाय करतो. मी आधी खूप संघर्ष केला आहे. आता माझ्याकडे पुरेसा पैसा आहे तर मला मित्र, मतदारसंघ, गाव आणि बंगळूरसाठी काही तरी करायचे आहे. आमच्या 6 मतदारसंघातील 3 लाख मुलांना मी शिक्षण देणार आहे.

शरीफ यांच्याकडे स्थावर मालमत्ता 1 हजार 643 कोटी रुपये, जंगम मालमत्ता 97.98 रुपये आणि कर्ज 67.24 कोटी रुपयांचे आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीकडे स्थावर मालमत्ता 1.30 कोटी रुपये आणि जंगम मालमत्ता 98.96 लाख रुपये आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नीकडे जंगम मालमत्ता 32.22 लाख रुपये आहे. इतर मालमत्ता त्यांच्या मुलांच्या नावावर आहे.

शरीफ हे मूळचे कोलार गोल्ड फिल्ड्स येथील आहेत. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले असून, ते सरकारी शाळेत झाले आहे. त्यांना दोन पत्नी आणि पाच मुले आहेत. त्यात एक मुलगी आणि पाच मुलांचा समावेश आहे. शरीफ यांच्याकडे 3 कोटी रुपयांच्या मोटारी आहेत. यात एक रोल्स रॉईस आणि दोन फॉर्च्युनर मोटारींचा समावेश आहे. अब्जाधीश उमेदवाराला काँग्रेसने अचानक विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT