Congress MP Gowal Padvi demand : महाराष्ट्रातील काँग्रेसचे तरूण खासदार गोवाल पाडवी यांच्यामुळे पक्ष अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत बोलताना आदिवासींच्या धार्मिक अस्तित्वाबाबत धक्कादायक मागणी करत खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस हिंदूंना तोडण्याचे षडयंत्र करत असल्याची चर्चा आता सोशल मीडियातून सुरू झाली आहे.
खासदार पाडवी यांनी आज लोकसभेत बोलताना आदिवासींना हिंदू न मानता वेगळ्या धर्माची मान्यता देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी १९३१ मधील ब्रिटीशांच्या काळातील जनगणनेचा हवाला दिला आहे. काँग्रेसकडून हे भाषण सोशल मीडियात पोस्ट केले आहे. त्यावर अनेक यूझर्सने काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. त्यावरून हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले पाडवी?
पाडवी म्हणाले, १९३१ मध्ये देश गुलामगिरीत असताना इंग्रजांनी आदिवासींची गणना वेगळी केली होती. आदिवासींची जनगणना करताना वेगळा धर्म कोड देण्यात आला होता. आदिवासींची विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख अन्य कोणत्याही धर्माशी मिळतीजुळती वाटत नाही. त्यामुळे आदिवासी वर्गला जनगणना आणि अन्य सरकारी कागदपत्रांमध्ये एक वैध आणि स्वतंत्र धार्मिक श्रेणी म्हणून मान्यता दिली जावी.
सोशल मीडियातून संताप
काँग्रेसच्या पोस्टवर सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे. ही आदिवासींची ओळख जपण्यासाठी नाही तर हिंदू समाज तोडण्याचे षडयंत्र असल्याची टीका होऊ लागली आहे. एका यूझर्सने म्हटले आहे की, इंग्रजांनी केलेली जनगणना त्यांच्या तोडा आणि राज्य करा या धोरणाचा भाग होती. त्यावेळी जनगणना आयोगाने मान्य केले होते की, आदिवासी मुळचे हिंदू समाजाचा भाग आहेत. केवळ त्यांच्या परंपरा थोड्या वेगळ्या आहेत. त्यामुळे १९४१ मध्ये त्यांना पुन्हा हिंदू श्रेणीत घेण्यात आले होते, असे एका यूझर्सने म्हटले आहे.
पाडवी यांच्या या विधानावर एका यूझरने गंभीर इशारा देताना म्हटले आहे की, ‘आदिवासींना वेगळा धर्म म्हणून मानले तर ते अनुसूचित जमातीचा दर्जा गमावतील. कारण आरक्षणाचा लाभ हिंदू, शीख, बौध्द पंरपरेशी जोडलेल्या लोकांना मिळत आहे. ख्रिश्नन मिशनऱ्यांना धर्मांतराची खुली सूट मिळेल.’ ही मागणी आदिवासींच्या हिताची नाही. हा सांस्कृतिक संरक्षण नव्हे तर सांस्कृतिक नरसंहाराचा प्रस्ताव असल्याचे एका यूझरने म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.