Rahul Gandhi - PM Narendra Modi
Rahul Gandhi - PM Narendra Modi sarkarnama
देश

Congress News: नेहरुंचा अपमान करणे मोदींना महागात पडणार ?; काँग्रेसने उचलले मोठं पाऊल

सरकारनामा ब्युरो

Congress Vs BJP: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरोधात अपमानजनक विधान केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते, राष्ट्रीय महासचिव केसी वेणुगोपाल यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.

वेणुगोपाल यांनी राज्यसभेचे अध्यक्षांना याबाबत पत्र लिहिलं आहे. "नेहरु आडनाव लावण्यास लाज का वाटते," असे गांधी परिवाराबाबत केलेल्या विधानाचा दाखला वेणुगोपाल यांनी या पत्रात दिला आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (शुक्रवारी) राहुल गांधी यांनी केलेल्या लंडन येथे केलेल्या विधानावरुन दोन्ही सभागृहात सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यात पुन्हा खडाजंगी झाली. त्यानंतर लोकसभा, राज्यसभेचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले.

९ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हक्कभंग केला, याबाबतचा मी हक्कभंगाचा प्रस्ताव देत असल्याचे वेणुगोपाल यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की मला खूप आश्चर्य वाटते की माझ्याकडून कधी कधी नेहरु यांचे नाव घेण्याचे राहून जाते. ती चुक लक्षात आल्यावर मी ती दुरुस्त करतो. कारण ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. पण मला हे लक्षात येत नाही की त्यांची पिढी त्यांचे आडनाव का लावत नाही, नेहरु आडनाव लावताना लाज का वाटते, नेहरु हे महान व्यक्तीमत्व होते, ते गांधी परिवाराला मान्य नाही का?

राष्ट्रीय महासचिव वेणुगोपाल म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी हे उपहासात्मकपद्धतीने केलेले विधान नेहरु परिवार, तसेच इंदिरा गांधी यांचा अपमान करणारे आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे लोकसभेचे सदस्य आहेत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT