नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी `नमामी गंगे' योजनेसाठीचे अनुदान २० हजार कोटींवरून ३० हजार कोटींपर्यंत वाढवूनही गंगा स्वच्छ झालेली नाही यावरून राज्यसभेत (Rajyasabha) काँग्रेसने (Congress) सरकारला चांगलेच धारेवर धरले. खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी "पवित्र गंगा नदीला जीवनदायिनी म्हणतात. पण कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत विशेषतः उत्तर प्रदेशात (UP) तिला अक्षरशः शववाहिनीची अवकळा आली होती ती का व कशी?" असा हल्लाबोल त्यांनी केला.
केतकर यांनी शून्य प्रहरात यावर मांडलेल्या मुद्याला अनेक सदस्यांनी पाठिंबा दिला. विरोधी पक्षांच्या १२ सदस्यांनी तर त्याबरोबर स्वतःला थेट संबंध्द (असोसिएट) केले. गंगेच्या शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने दिलेली डेडलाईन उलटून तीन वर्षे उलटली तरी गंगेची अस्वच्छता तशीच आहे, असे सांगून केतकर यांनी ‘नमामी गंगे ही मोदी यांनीच २०१५ मध्ये गाजावाजा करून लॉंच केलेली योजना असल्याने गंगेच्या वर्तमान दुरवस्थेसाठी ते पंडित नेहरू किंवा राहूल गांधी किंवा कॉंग्रेस पक्ष यांना जबाबदार धरू शकत नाहीत' असा टोला लगावला.
केतकर म्हणाले, पंतप्रधानांच्या स्वतःच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय गंगा प्राधिकरणाने गंगा २०१९ पर्यंत पूर्ण स्वच्छ, निर्मल व अविरल झालेली असेल, असा जाहीर शब्द दिला होता. त्यालाही आता ३ वर्षे उलटली. मात्र, गंगेच्या स्वच्छतेसाठी भरीव काही झाले नाही. कोरोना काळात शेकडो मृतदेह गंगेच्या पात्रावर तरंगू लागले व ही स्थिती असेल तर गंगा कधीच स्वच्छ होऊ शकत नाही. गंगा प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार गंगा दिवसेंदिवस अधिक अस्वच्छ होत चालली आहे. नमामी गंगेसाठीचा निधी रोषणाई व पूजापाठ यासाठीच वापरण्यात आल्याचाही आरोप केतकरांनी केला.
आरोग्याच्या दृष्टीने दूषीत पाणी असलेल्या गंगेत अंघोळी करू नयेत, असे तज्ज्ञ सांगतात पण स्वतः मोदी यांनीच गंगेत 'डुबकी' मारून देशवासीयांसमोर अत्यंत वाईट उदाहरण ठेवले आहे. भारताचे वर्णन ‘जिस देश मे गंगा बहेती है' असे एकेकाळी केले जायचे आता मात्र, देशाचे वर्णन करताना 'राम तेरी गंगा मैली' असे म्हटले जाते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणानुसार गंगेच्या पात्रापैकी सुमारे १२ हजार किलोमीटरचे व किमान ३५१ ठिकाणचे पात्र अत्यंतीक दूषीत आहे याकडेही केतकरांनी लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.