Congress News : काँग्रेस पक्ष पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीसाठी तयार करत असताना त्यांना मोठा धक्का बसला आहे. विद्यमान खासदाराने थेट काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहित राजीनामा दिला आहे. त्यामुळे आसाम काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
विद्यमान खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी मंगळवारी आपला राजीनामा दिला. आसाम विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून निवडणूक अवघ्या 20 दिवसांवर असतना बोरदोलोई यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरदोलोई हे नागाव मतदारसंघाचे खासदार आहेत. या मतदारसंघातील लहरीघाट या विधानसभेचा उमेदवार ठरवताना झालेल्या चर्चेत बोरदोलोई यांना विश्वासात घेतले नाही. तसेच त्यांच्याबद्दल अपशब्द देखील वापरले गेले.
दिल्लीत झालेल्या या बैठकीत आपण उपस्थित नव्हतो. मात्र, आपल्या बद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्यानंतर देखील गौरव गोगई हे शांत राहिले. त्यामुळे मला अपमानित झाल्यासारखे वाटते आहे, असे देखील ते म्हणाले.
बोरदोलोई यांचा मुलगा काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार आहे. 9 एप्रिल रोजी होणाऱ्या राज्य निवडणुकीमध्ये तो मार्घेरिटा विधानसभा मतदारसंघातून लढणार आहे. मात्र, त्यांच्या वडिलांने राजीनामा दिल्याने समीकरण बदलले आहे. त्यामुळे त्यांचे वडील काँग्रेस सोडणार का? याची चर्चा सुरू झाली असून भाजपने बोरदोलोई आमच्या संपर्कात नाहीत मात्र त्यांच्याशी संपर्क साधला जाईल, असे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.