Baba Siddique, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावरून राहुल गांधींनी महायुती सरकारला फटकारलं; म्हणाले, "महाराष्ट्रातील..."

Rahul Gandhi On Baba Siddique Death : सत्ताधारी पक्षातील नेत्याची हत्या झाल्यामुळे विरोधकांसह सर्वसामान्यांकडून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय या हत्येच्या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचंही विरोधक म्हणत आहेत.

Jagdish Patil

Mumbai News, 13 Oct : मुंबईत ऐन दसऱ्याच्या दिवशी शनिवारी रात्री (ता.12) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे राज्यासह संपूर्ण देश हादरला आहे.

शिवाय सत्ताधारी पक्षातील नेत्याची हत्या झाल्यामुळे विरोधकांसह सर्वसामान्यांकडून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय या हत्येच्या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

सत्ताधाऱ्यांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचंही विरोधक म्हणत आहेत. अशातच आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील या प्रकणावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक पोस्ट केली आहे.

त्यामध्ये त्यांनी लिहिलं की, "बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूचं वृत्त धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबसह आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचं दिसून येतं आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि बाबा सिद्दीकींना न्याय मिळाला पाहिजे."

बाबा सिद्दीकींची कधी आणि कशी झाली हत्या?

बाबा सिद्दीकी हे रात्री साडे नऊच्या सुमारास त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात आले होते. या वेळा कार्यालयाबाहेर त्यांच्यावर तीन अज्ञातांनी गोळ्या झाडल्या. या तिघांपैकी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर तिसरा हल्लेखोर फरार आहे. दरम्यान, हे आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित असल्याची चर्चा सुरू आहे.

मात्र, ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली याबाबतची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही. मात्र, या घटनेच्या तपासासाठी पोलसांची टीम कार्यरत असून त्यांच्या अनेक बाबी लक्षात आल्या आहेत. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT