टराहुल गांधींनी मतदार याद्यांमधील घोळ समोर आणताना हजारो मतदारांचे घर क्रमांक 0 कसे काय? हा प्रश्न उपस्थित केला होता. दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी 0 घर क्रमांक का दिले जातात? याचं स्पष्टीकरण दिलं होतं. पण आता काँग्रेसनं नव्या घर क्रमांकांचा घोळ समोर आणला आहे. तसंच हे मतदार काय क्लाऊड स्टोरेजमध्ये राहतात की काय? असा नवा सवाल उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे याचंही उत्तर निवडणूक आयोगानं द्यावं अशी अपेक्षा काँग्रेसनं व्यक्त केली आहे.
केरळ काँग्रेसनं ट्विट करत मतदार यादीतला नवा घोळ समोर आणला आहे. त्यानुसार, खोचक ट्विट करत काँग्रेसनं म्हटलं की, "प्रिय भारतीय निवडणूक आयोग आम्ही तुम्हाला विनंती करतो की, आमचे आवडते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासोबत जयपूरजवळील गावांमधील घर क्रमांक 999999 यावर स्पष्टीकरण देण्यासाठी तातडीनं पत्रकार परिषद घ्यावी. आमचा अंदाज आहे की हे लोक क्लाउड स्टोरेजमध्ये राहत आहेत"
काँग्रेसनं १५ मतदारांची यादी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये या सर्वांच्या पत्त्यावर घर क्रमांक हा 999999 असा देण्यात आलेला आहे. हा एक सारखाच घरक्रमांक असता तरी तो 0 हा नाही. कारण मुख्य निवडणूक आयुक्तांना 0 घर क्रमांक हा ज्यांना घरं नाहीत अशा लोकांसाठी वापरले जातात असं स्पष्टीकरण दिलं होतं. पण आता 999999 हा घर क्रमांक नेमका कोणत्या कारणासाठी दिला जातो हे, मात्र निवडणूक आयुक्तांनी सांगितलेलं नाही. त्यामुळं त्यांनी यासाठी तातडीनं एक पत्रकार परिषद घेऊन याचं कारण जाहीर करुन टाकावं, अशी खोचक मागणी केली आङे.