Charanjit Singh Channi
Charanjit Singh Channi 
देश

Congress News : कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा प्रताप; सरकारी तिजोरीतून मुलाच्या लग्नासाठी खर्च?

सरकारनामा ब्युरो

Charanjit Singh Channi News : पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) दक्षता ब्युरोच्या रडारवर आहेत. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या मुलाचे लग्न सरकारी तिजोरीतून केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. चन्नी यांनी सरकारी तिजोरीतून 60 लाख रुपयांचे जेवण महागड्या हॉटेलमधून मिळविल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, नाश्त्याच्या पराठ्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी चन्नी सरकारने सरकारी तिजोरीतून पैसे दिल्याचे समोर आले आहे. त्यांच्या 3 महिन्यांच्या कार्यकाळात सुमारे 60 लाख रुपये अन्नवर खर्च केले. चन्नी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात दररोज 70 जणांचे जेवण ताज हॉटेलमधून येत असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. चन्नी यांच्यासाठी ताज हॉटेलमधून तीन हजार 900 रुपये किमतीचे जेवण आणि दोन हजार 500 रुपयांचा ज्यूस मागवण्यात येत होता. सलग 3 महिन्यांपासून 70 जणांच्या जेवणाचे बिल सरकारी खर्चातून केल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, हा सर्व खर्च त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी करण्यात येत होता, असा आरोप करण्यात आला आहे.

60 लाखांच्या बिलावर काय दिले होते स्पष्टीकरण?

मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले जात आहे. माझ्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत चन्नी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून मागवलेल्या जेवणाचे तीन महिन्यांचे 60 लाख रुपयांचे बिल सरकारने भरल्याबाबत चन्नी म्हणाले की, मी कधीही मद्यप्राशन केलेले नाही, मी शाकाहारी आहे आणि सात्विक आहार घेतो. मुख्यमंत्री निवासस्थानी आपल्याला भेटायला शेकडो लोक यायचे त्यांच्यासाठी हे जेवण मागवल्याचे स्पष्टीकरण चन्नी यांनी दिले आहे.

दरम्यान, चरणजीत सिंह चन्नी यांची एप्रिल २०२२ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी केली होती. एका कथित वाळू उत्खनन प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात त्यांची सहा तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. यानंतर चन्नी यांनी ट्विट केले होते की, खाण प्रकरणी ईडीने आपल्याला समन्स बजावले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'मी माझ्या माहितीनुसार त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या प्रकरणी ईडीने यापूर्वीच माननीय न्यायालयात चलन सादर केले आहे. अधिकाऱ्यांनी मला पुन्हा येण्यास सांगितले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT