Mallikarjun Kharage  news
Mallikarjun Kharage news  sarkarnama
देश

Congress President : निवडणुकीत ट्विस्ट दिग्विजय सिंह यांची माघार ; मल्लिकार्जुन खर्गे रिंगणात ?

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक न लढविण्याचा निर्णय राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जाहीर केला. त्यानंतर तीन जणांचे नाव चर्चेत होते. दिग्विजय सिंह, शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे तीन नावे चर्चेत असताना दिग्विजय सिंह यांनी माघार घेतली आहे, याचे कारण त्यांनी सांगितले आहे. यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. (congress president latest news)

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय आहेत, त्यांचे नाव आता अध्यक्षपदासाठी पुढे आले आहे. खर्गे यांच्यासाठी दिग्विजय सिंह यांनी माघार घेतली आहे. शशी थरुर यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे.

"मी काल खरगे यांच्या घरी गेलो होतो, त्यांना सांगितले की, तुम्ही उमेदवारी अर्ज भरत असाल तर मी निवडणूक लढवणार नाही. ते उमेदवार असल्याची माहिती आज मला माध्यमांमधून मिळाली. मी आज पुन्हा त्यांच्या घरी गेलो, त्यांना म्हणालो तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तुमच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा मी विचारही करू शकत नाही. आता त्यांचा निवडणूक लढवण्याचा मानस असल्याने मी त्यांचा समर्थक होण्याचे मान्य करतो.” असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री म्हणाले,"दिग्विजय सिंह आणि शशी थरूर आज अर्ज भरणार आहेत. पण, सूत्रांच्या हवाल्याने दिग्विजय यांनी निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचा दावा करण्यात येत आहे. म्हणजेच सस्पेन्स आहे. खर्गे हे गांधी कुटुंबाची निवड असून दिग्विजय त्यांचे प्रस्तावक होऊ शकतात,"

राजस्थान काँग्रेसमधील नेतृत्वावरुन सत्तानाट्य रंगत असतानाच काँग्रेसमध्ये बऱ्याच दिवसांनी गुरुवारी मध्यरात्री राजकीय खलबते झाली. त्यामध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही बऱ्याच दिवसांनी सामील झाल्या होत्या.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढणार नाहीत, हेही स्पष्ट झाले आहे. अशोक गहलोत यांचे नाव वगळल्यानंतर दिग्विजय सिंह आणि शशी थरूर हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या दावेदारांमध्ये होते. मात्र गुरुवारी झालेल्या G-23 च्या बैठकीनंतर तिसरा उमेदवार येण्याची शक्यता बळावली आहे. कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही विचारण्याआधीच अशोक गेहलोत यांनी २५ सप्टेंबरच्या घटनेबाबत माफी मागितली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT