Shashi Tharoor
Shashi Tharoor  Sarkarnama
देश

Congress Presidential Election : शशी थरुरांचा मोठा गौप्यस्फोट ; माघार घेण्यासाठी..

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : कॉंग्रेसमध्ये सध्या राजकीय वाद निर्माण झाले आहेत. राजस्थान मुख्यमंत्रीपद, कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक (Congress presidential election)यावरुन कॉंग्रेसमधील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. अशातच कॉंग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते तिरुवनंतपुरम येथे प्रचारास आले असता ते माध्यमांशी बोलत होते. शशी थरुर यांच्या विरोधात ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे रिंगणात आहेत.

शशी थरुर यांनी केलेल्या विधानामुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव येत असल्याचा गौप्यस्फोट शशी थरुर यांनी केला आहे, "मी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा," यासाठी काही नेत्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली आहे. थरुर यांची काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांच्याशी भेट घेतली होती, त्यावेळी गांधी यांनी त्यांना याबाबत सांगितले होते.

"कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. लोकांमधून अध्यक्ष निवडला गेला तर त्यांच्याकडून चांगले काम होईल, असे राहुल गांधी " असे थरुर म्हणाले.

कॉंग्रेसमधील काही बडे नेते त्यांना पाठिंबा देत नसल्याचे थरुर यांनी सांगितले. खर्गे यांच्यासोबत मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले. "मी निवडणूक लढवावी असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे," असे थरुर म्हणाले.

येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला आव्हान देण्याबाबत दोघांच्या विचारात मतभेद असल्याचे शशी थरुर यांनी सांगितले. थरूर म्हणाले, "मी राहुल गांधी यांना विश्वास दिला आहे. कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा विश्वास मी गमावणार नाही, त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. युवा मतदार माझ्यासोबत आहेत,"

खर्गे आणि थरुर यांच्यात ही अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. यातील एकाने माघार घेतली तर निवडणूक बिनविरोध होईल. १७ आँक्टोबरला मतदान होणार असून नऊ हजार सदस्य मतदान करणार आहेत. १९ आँक्टोबर रोजी निकाल लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT