BJP Congress Vande Mataram : वंदे मातरम् गीतावरून काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी भाजपला थेट आव्हान देत, कागदाचा तुकडा, मोबाईल किंवा टेलिप्रॉम्प्टर न वापरता संपूर्ण वंदे मातरम् म्हणून दाखवावे, असे म्हटले आहे. भाजप नेत्यांना छापील प्रत समोर असतानाही गीत म्हणताना अडखळावे लागल्याचा दावा त्यांनी केला.
प्रियांक खर्गे म्हणाले, “मी भाजपवाल्यांना (BJP) आव्हान देतो. कोणत्याही कागदाचा तुकडा, मोबाईल किंवा टेलिप्रॉम्प्टर न वापरता त्यांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हणून दाखवावे. त्यांना ते म्हणता आले का? आज त्यांच्याकडे छापील प्रत असतानाही ते अडखळत होते. त्यांना इतिहासाचा अधिक चांगला अभ्यास करण्याची गरज आहे.”
कर्नाटकात यापूर्वी भाजपचे सरकार (Government) असतानाही वंदे मातरम् गीताच्या सर्व कडव्यांच्या पठणाचा मुद्दा भाजपने उपस्थित केला नव्हता, असा दावा खर्गे यांनी केला. कर्नाटकात यापूर्वीही भाजपचे सरकार होते. मग राज्य भाजपपासून ते केंद्रीय भाजपपर्यंत कोणीही राष्ट्रीय गीताची सर्व कडवी म्हणण्यात यावीत, असे का म्हटले नाही? असा सवाल त्यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही खर्गे यांनी निशाणा साधला. त्यांनाही वंदे मातरम् ची चारही कडवी व्यवस्थित म्हणता येत नाहीत, असा दावा त्यांनी केला.
यावेळी खर्गे यांनी भारतातील अधिकृत भाषांच्या मुद्द्यावरही भूमिका मांडली. देशातील विविध भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा देण्याची मागणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतामध्ये अनेक भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी आहे. भारतात कोणतीही भाषा बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या राज्य सरकारकडे त्या भाषेला अधिकृत भाषा करण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे. हा विषय समोर येईल, त्याप्रमाणे आम्ही त्यावर निर्णय घेऊ, असे प्रियांक खर्गे यांनी सांगितले.
वंदे मातरम् गीताच्या पठणावरून सुरू झालेला हा वाद आता काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. प्रियांक खर्गे यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या मुद्द्यावरून कर्नाटकातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.