Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखले अन् काँग्रेसला राम आठवला...

Bharat Jodo Nyaya Yatra: मी कोणता गुन्हा केला आहे की मी मंदिराला भेट देऊ शकत नाही?

Sachin Deshpande

न्याय यात्रेत लीड करणाऱ्या काँग्रेस नेते राहूल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आले. आसाममध्ये ते बटादरवा थान दौऱ्यावर असताना त्यांना रोखण्यात आले. स्थानिक पोलिसांनी त्यांना मंदिरात जाण्यापासून थांबविले. त्याच बरोबर यावेळी राहुल गांधी "आम्हाला मंदिराला भेट द्यायची आहे. मी कोणता गुन्हा केला आहे की मी मंदिराला भेट देऊ शकत नाही?..." असा प्रश्न करत पोलिस प्रशासनासमोर मुद्दा उपस्थित केला.

देशभरात अयोध्येतील राम मंदिर उदघाटन सोहळा होत असताना काँग्रेस नेते राहूल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून आसाममध्ये का थांबविले गेले असा प्रश्न निर्माण होत आहे. काँग्रेस नेत्यांच्या गाड्यावर आसाममध्ये हल्ले होत असताना आज थेट राहूल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखल्याचे चित्र समोर आले आहे.

लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना काँग्रेसची मणिपूर ते मुंबई ही न्याय यात्रा आज थौबलपासून निघाली आहे. काँग्रेसचा दावा आहे की, ही भारत जोडो न्याय यात्रा राजकीय नाही. आसाममधून जात असताना भारत जोडो न्याय यात्रेवर हल्ला झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. आज थेट राहूल गांधी यांना स्थानिक मंदिरात जाण्यापासून का रोखण्यात आले असा प्रश्न निर्माण होत आहे. आसाममध्ये काँग्रेसला न्याय यात्रेला अनेक अडचणी समोर येत आहे. काँग्रेस प्रवक्ता जयराम रमेश यांच्या ताफ्यावर सोनितपूर पुर येथे हल्ला झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना काँग्रेसची मणिपूर ते मुंबई ही न्याय यात्रा आज थौबल पासून निघाली आहे. काँग्रेसचा दावा आहे की, ही भारत जोडो न्याय यात्रा राजकीय नाही. पण, काँग्रेसच्या या यात्रेचा एकूण रोडमॅप पाहिल्यावर ही राजकीयच यात्रा असल्याचे स्पष्ट दिसून येते. कन्याकुमारी ते श्रीनगर या पहिल्या भारत जोडो यात्रेच्या तुलनेत ही भारत जोडो न्याय यात्रा निम्मे दिवसात प्रवास करणार आहे. या यात्रेत बसमधून राहूल गांधी यांचा प्रवास असेल. ‘न्याय का हक, मिलने तक’ अशी घोषणा या यात्रेतून दिल्या जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी बेल्टमध्ये ही यात्रा धुमाकूळ घालेल काय या चिंता भाजपामध्ये व्यक्त केली जात आहे. काँग्रेसने यात्रेतून सोईस्करपणे त्यांच्या मित्र पक्षांच्या लोकसभा मतदार संघांना वगळुन ही यात्रा निश्चित केली आहे. काँग्रेसची ही यात्रा १५ राज्यातील जवळपास १०० लोकसभा मतदार संघातून जाणार असून विविध राज्यातील ३३० विधानसभा मतदार संघ कव्हर करेल. ११० जिल्ह्यातून जाणारी ही काँग्रेसची न्याय यात्रा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘गेम चेंजर’ ठरते काय, हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होणार आहे.

आज अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत राम मंदिराचे उद्धघाटन होत असताना राहूल गांधी यांना आसाममध्ये मंदिर प्रवेशापासून पोलिसांनी का रोखले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रघुपती राघव राजाराम....

आसाम मधील नागाव येथे काँग्रेस नेते राहूल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून स्थानिक पोलिसांनी अडविले. त्याला जोरदार विरोध काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी केला. काँग्रेस नेते राहूल गांधी यांना थांबविल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आवडीचे लोकप्रिय गीत रघुपती राघव राजाराम पतीतपावन सीताराम म्हणत स्थानिक प्रशासनाला धारेवर धरले. नागाव हा जिल्हा असून ब्रह्मपुत्रा नदीच्या नजीक आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT