Priyanka, Rahul and Sonia Gandhi
Priyanka, Rahul and Sonia Gandhi  Sarkarnama
देश

गांधी परिवारावर बॉम्ब टाकणाऱ्या प्रवक्त्याला काँग्रेसनं दाखवला थेट घरचा रस्ता

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) मोठा फटका बसला आहे. यावरून पक्षातच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातून पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावरच पक्षाच्या प्रवक्त्याने थेट टीका केली होती. ही टीका या प्रवक्त्याला महागात पडली असून, त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे.

तमिळनाडूतील पक्ष प्रवक्ते अमरिकाई. व्ही. नारायणन (Americai V Narayanan) यांच्यावर काँग्रेसने कारवाई केली आहे. ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचेही सदस्य आहेत. पक्षाला वाचविण्यासाठी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी दूर करा, असे वक्तव्य त्यांनी केले होते. ते म्हणाले होते की, देशातील जनतेचा विश्वास संपादन करायचा असेल तर पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणावे लागेल. ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, शरद पवार, के. चंद्रशेखरराव यांना त्यांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची विनंती करावी.

नारायणन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना जाहीरपणे पक्षाला हा सल्ला दिला होता. त्यांनी म्हटले होते की, आधी काँग्रेसमध्ये असलेले नेते पुन्हा पक्षात आल्यानंतरच बाहेरच्यांमध्ये आणि मित्र पक्षांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. एकदा जनतेचे काँग्रेसबद्दल अनुकूल मत निर्माण झाले की सत्ता येतो आणि पैसाही येतो. ममता बॅनर्जी या काँग्रेसमध्ये आल्या तर त्या अन्य नेत्यांनाही विचार करण्यासाठी भाग पाडू शकतात.

नारायणन यांनी पक्षाच्या नेतृत्वावर बॉम्ब टाकला असला तरीसुद्धा ते बंडखोरांच्या ‘जी-२३’ गटाचे सदस्य नाहीत. ममता बॅनर्जी या स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहेत. असे असताना त्या स्वतःचा पक्ष काँग्रेसमध्ये कशासाठी विलीन करतील? असे विचारले असता नारायण म्हणाले की, काँग्रेसमध्ये येऊन पंतप्रधान होणे हे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरेल. सोनिया गांधी यांनी स्वतःच्या मुलांना दूर करत पक्षाचे नेतृत्व करावे. राहुल गांधी मलाही आवडतात पण ते ठोस निर्णय घेऊ शकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT