नवी दिल्ली : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत (up election) समाजवादी पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhiesh Yadav) आणि त्यांचे काका शिवपाल सिंह यादव यांच्या विरोधात कॉग्रेस उमेदवार देणार नसल्याचे कॉग्रेसने स्पष्ट केले आहे. मैनपुरीच्या करहल मतदार संघातून अखिलेश यादव, तर जसवंतनगर मतदारसंघातून शिवपाल यादव हे निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही ठिकाणी कॉग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. या दोन्ही (UP Assembly elections 2022) ठिकाणी २० फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमेठी आणि रायबेरली येथून कॉग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी याच्याविरोधात समाजवादी पार्टीने कॉग्रेससाठी उमेदवार दिले नव्हते. ''सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरोधात गेल्या लोकसभेच्या वेळी समाजवादी पार्टीकडून कुणीही उमेदवार रिंगणात नव्हते, त्यामुळे आम्हीही अखिलेश आणि शिवपाल याच्या विरोधात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे,'' असे कॉग्रेसचे महासचिव प्रकाश प्रधान यांनी सांगितले.
भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल म्हणाले, ''हा निर्णय नवीन नाही, समाजवादी पार्टी आणि कॉग्रेस एकत्र आहेत. पण आम्ही या जागा जिंकणार आहोत,'' ''प्रियंका गांधी जर रायबरेली विधानसभा निवडणूक लढविणार असेल तर त्याठिकाणी समाजवादी पार्टी निवडणूक लढविणार नाही,'' असे कॉग्रेसच्या सूत्रांनी सांगितलं. कॉग्रेसच्या बंडखोर उमेदवार, माजी आमदार अदिती सिंह यांनी प्रियंका गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे जाहीर केलं आहे. या ठिकाणी चौथ्य़ा टप्प्यात २७ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे.
मैनपुरी या समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो. अखिलेश यादव यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केल्यापासूनच मैनपुरी राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. अखिलेश यादव हे सध्या आझमगडचे खासदार आहेत. मैनपुरी येथे तिसऱ्या टप्यात निवडणूक होणार आहे. अखिलेश यादव राष्ट्रीय आरएलडी आणि उत्तरप्रदेशातील लहान-लहान पक्षाना सोबत घेऊन निवडणूक लढवत आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी गोरखपूर (शहर) मतदारसंघातून विधानसभा निवडणूक (Assembly elections) लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अखिलेश यादव यांनीही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची निर्णय घेतला. उत्तरप्रदेश निवडणुकीत (UP Assembly elections 2022) प्रचाराला वेग आला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या जात आहेत. उत्तर प्रदेशात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. समाजवादी पक्षही पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.